Former MLA Mohan Joshi | ‘पुण्यातही 500 चौरस फुटांपर्यंतच्या मिळकत धारकांना करमाफी द्यावी’ – प्रदेश काँग्रेस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Former MLA Mohan Joshi | सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पुण्यातही 500 चौरस फुटापर्यंतच्या मिळकत धारकांना (Property Tax Pune) महापालिकेनी (Pune Corporation) करमाफी (Tax Exemption) द्यावी, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi ) आणि प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे (Sanjay Balgude) यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

 

मुंबई महापालिकेने (BMC) 500 चौरस फुटांच्या घरांचा मिळकत कर रद्द केलेला आहे. त्या धर्तीवर पुणे महापालिकेनेही (PMC) मिळकत कर रद्द करावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने यापूर्वीच केलेली होती. महापालिकेतकर सवलतीचा ठरावही मांडला, मंजूर झाल्यावर राज्य शासनाकडे (Maharashtra Government) पाठविला होता. पन्नास हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन तत्कालीन मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिले होते, अशी माहिती मोहन जोशी, संजय बालगुडे यांनी दिली.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या साथीमुळे लोकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे, त्यातही औषधोपचारांवर बराच खर्च झाला आहे.
यातून लोकं अद्याप सावरलेले नाहीत तोच परत कोरोनाची तिसरी लाट ओमायक्रॉन या साथींनी डोकं वर काढलं आहे.
या परिस्थितीत पुन्हा निर्बंध येणे अटळ आहे. लोकांच्या हातात पुरेसे उत्पन्न नाही. त्यातच मिळकत कर भरण्याचा बोजा त्यांना सोसवणारा नाही.
त्यामुळे ५००चौरस फुटापर्यंतच्या मिळकतीवरचा कर रद्दच करण्यात यावा,
अशी मागणी मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) आणि संजय बालगुडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

 

महापालिकेचे उत्पन्न (PMC Income) यंदा डिसेंबर महिन्यातच उद्दीष्टापेक्षाही वाढले आहे,
२०२१मध्ये बांधकाम क्षेत्राला चालना मिळाल्याने पालिकेचे उत्पन्न ४००कोटीहून अधिक वाढले
असून मार्च पर्यंत ते अधिक वाढेल हे लक्षात घेऊन महापालिका करमाफी देऊ शकते.
अशा करमाफीतून महापालिकेवर फार मोठा आर्थिक बोजा पडणार नाही.
ही बाब लक्षात घ्यावी, असेही मोहन जोशी, संजय बालगुडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

 

Web Title :- Former MLA Mohan Joshi | tax exemption should be given to property holders up to 500 square feet in pune- Former MLA Mohan Joshi and Sanjay Balgude

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Delhi High Court | ‘लग्नापूर्वी आजार लपवणे फसवणूक आहे, रद्द होऊ शकतो विवाह’ – दिल्ली हायकोर्ट

Pune Crime | 51 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर 59 वर्षाच्या पतीचा संशय, गळा घोटून संपवलं; पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील घटना

Pune Crime | 76 वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हर डोस देऊन प्लॅस्टिक पिशवीत चेहरा घालून खून, नातेवाईकांना मेसेज पाठवून आरोपी इंजिनिअर मुलाची आत्महत्या; पुणे शहरात खळबळ