Former Mumbai CP Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर CBI कडून गुन्हा नोंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 30 जून रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर ईडीने (ED) सीबीआयने (CBI) मुंबई पोलीसचे (Mumbai Police) माजी आयुक्त संजय पांडे (Former Mumbai CP Sanjay Pandey) यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने चौकशी (ED Inquiry) केल्यानंतर आता सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. संजय पांडे (Former Mumbai CP Sanjay Pandey) आणि एनएसईच्या सीईओ चित्रा रामकृष्ण (NSE CEO Chitra Ramakrishna) यांच्यावर बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी (Phone Tapping Case) गुन्हा दाखल झाला आहे.

 

दरम्यान, सीबीआयच्या अधिकार्‍यांनी संजय पांडे (Former Mumbai CP Sanjay Pandey) यांच्या घरावर छापा टाकला आहे. 1986 बॅचमधील आयपीएस (IPS) अधिकारी संजय पांडे असलेले संजय पांडे आणि चित्रा रामकृष्ण यांनी एक ऑडिट कंपनी स्थापन केली होती. 2018 पासून सीबीआय एनएसई स्कॅमचा तपास करत आहे. 2009 ते 2017 या काळात शेअर मार्केटमधील (Stock Market)कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

मनी लाँडरिंग प्रकरणात (Money Laundering Case) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नोटीस बजावली होती. यानंतर त्यांची मंगळवारी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली.

सूत्रांच्या माहितीनुसार, संजय पांडे यांनी 2001 मध्ये एक आयटी ऑडिट कंपनी (IT Audit Company) सुरू केली होती. त्यादरम्यान पांडे यांनी दिलेला राजीनामा न स्वीकारल्याने ते पुन्हा पोलीस दलात रुजू झाले. त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीत मुलगा आणि आईला त्यांनी संचालकपदी नेमले. 2010 आणि 2015 च्या दरम्यान पांडे यांच्या कंपनीला एनएसई सर्व्हर आणि सिस्टम्सचे आयटी ऑडिट (System IT Audit) कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. दरम्यान, सीबीआयने नॅशनल स्टॉक एक्स्चेंज National Stock Exchange (एनएसई) घोटाळ्यात 2018 मध्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

 

याच गुन्ह्याच्या आधारे ईडीदेखील याप्रकरणी चौकशी करत आहे. सीबीआयनेही पांडे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

 

Web Title :- Former Mumbai CP Sanjay Pandey | former mumbai police commissioner sanjay pandey hit the cbi recorded the offense

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Eknath Shinde | CM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होणार, खातेवाटपावर चर्चा?

 

Maharashtra Congress | काँग्रेसनं मोठा निर्णय घेतल्यानं शिवसेनेला मोठा धक्का ?

 

Deepak Kesarkar | दिपक केसरकरांचं मोठं विधान; म्हणाले – ‘वेळ गेलेली नाही, उद्धव ठाकरे भाजपाच्या वरिष्ठांशी बोलले तर…’