माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे एम्स रूग्णालयात आज (दि.16) उपचारादरम्यान निधन झाले. वाजपेयींवर गेल्या दोन महिन्यांपासून उपचार सुरू हाेते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती जास्तच खालावली हाेती. त्यामुळे त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले हाेते. वाजपेयी यांच्यावर ११ जून २०१८ पासून एम्समध्ये उपचार सुरू हाेते. किडनीच्या आजारानं त्रस्त असलेल्या 93 वर्षांच्या वाजपेयींची प्रकृती गंभीर हाेती. याशिवाय त्यांना स्मृतीभ्रंशही झाला हाेता.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या विषयी :-

वाजपेयींचा जन्म २५ डिसेंबर १९२४ ला ग्वाल्हेर येथे झाला. त्यांचे वडील कृष्णा बिहारी वाजपेयी हे एक शिक्षक आणि कवी हाेते. त्यांच्या  आईचे नाव कृष्णादेवी हाेते. त्यांचं बालपण मध्यमवर्गीय कुटूबांत गेलं. वाजपेयी यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण ग्वॉल्हेरच्या लक्ष्मीबाई कॉलेजात झाले. तेथून त्यांनी हिंदी, इग्रंजी आणि संस्कृत या विषयात पदवी संपादन केली. पुढे कानपूरच्या डिएव्ही कॉलेजमधून त्यांनी राज्यशास्त्रात एम ए केले. आयुष्यभर अविवाहित राहिलेले वाजपेयी राजकारणात येण्यापूर्वी पत्रकार होते. मासिक राष्ट्रधर्म, साप्ताहिक पांचजन्य, स्वदेश आणि वीर अर्जुन या दैनिकांचं संपादन वाजपेयींनी केलं होतं.

ते १९९१ ते २००९ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथूनज खासदार होते. केवळ १३ दिवस टिकलेल्या ११ व्या लोकसभेत तसेच त्यानंतरच्या १२ व्या लोकसभेत (१९ मार्च १९९८ ते १९ मे २००४) ते पंतप्रधान होते. यासोबतच त्यांनी जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८-१९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५-१९७७), जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (१९७७-१९८०), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८०-१९८६) आणि भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८०-१९८४, १९८६, १९९३-१९९६), ११ व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते तसेच २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ दरम्यान भारतीय परराष्ट्रमंत्री ही पदे भूषविली आहेत.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या विषयी सर्व माहिती

राजकीय प्रवासाची सुरूवात :-
राजकारणाशी वाजपेयी यांचा पहिला संबंध १९४२ मध्ये भारत छोडो चळवळीच्या निमित्ताने आला. तेव्हा त्यांना अटक झाली होती. नंतर ते थोड्याच दिवसांनी श्यामाप्रसाद मुखर्जी व पर्यायाने भारतीय जनसंघ यांच्या संपर्कात आले. भारतीय जनसंघाचे नेते म्हणूनच त्यांची कारकीर्द सुरू झाली. वाजपेयी प्रथमच १९५७ मध्ये संसदेवर बलारामपूर मतदारसंघातून निवडून गेले. तरूणपणातच आपल्या अमोघ वाणीने त्यांनी विरोधी पक्षात असूनही सर्व स्तरावर वाहवा तसेच आदरही मिळवला. त्याची भाषणे अतिशय उत्तम व दर्जेदार म्हणून गणली जात. खुद्द जवाहरलाल नेहरूंनी वाजपेयी एकदिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान असतील अशा शब्दात त्यांचा गौरव केला होता.

ज्येष्ठ संसदपटू असलेले अटल बिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते. श्री. वाजपेयी नऊ वेळा लोकसभेवर तर दोनवेळा राज्यसभेवर निवडून आले होते हाही एक प्रकारचा विक्रमच आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे अंतर्गत व परकीय धोरणास आकार देण्यात एक पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष व एक विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी समर्थपणे भूमिका बजावली.

पुण्यातील व्यक्ती आणि संस्थांशी अटलजींचे घनिष्ट संबंध

पंतप्रधान पद :-
पहिली वेळ (मे १९९६)

दुसरी वेळ (मार्च १९९८)
तिसरी वेळ (ऑक्टोबर १९९९ – मे २००४)

महत्वाची कामगिरी :-
अणुचाचणी पोखरण २ (आॅपरेशन शक्ती) ११-१३ मे १९९८
लाहोर भेट आणि चर्चा
कारगील युद्ध (१९९९)

भारतीय प्रवासी विमानाचे अपहरण :-
सन १९९९ साली तालीबानी अतिरेक्यांनी IC – ८१४ या प्रवासी विमानाचे अपहरण केले. हे विमान नेपाळची राजधानी काठमांडूकडून दिल्लीला निघाले होते. अतिरेक्यांच्या या कृतीमुळे वाजपेयी सरकारने ३ अतिरेक्यांच्या बदल्यात प्रवासी विमानाची सुटका करून घेतली हाेती.

२००१ संसदेवरचा हल्ला :-
२००१ साली दहशतवादी अफझल गुरू आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला हाेता. या हल्ल्यामध्ये ७ भारतीय सुरक्षा रक्षक मारले गेले हाेते. मात्र, दहशतवाद्याचा खात्मा पोलिसांनी केला म्हणून मोठा अनर्थ टळला. कारण एका दहशतवाद्याच्या अंगावर पूर्ण संसद उडवू शकेल एवढे RDX होते.

पुरस्कार :-
१९९२-पद्मविभूषण पुरस्कार
१९९३ -डी. लिट. कानपूर विश्वविद्यालय
१९९४-लोकमान्य टिळक पुरस्कार
१९९४-उत्क्रृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार
२०१४-भारतरत्‍न

साहित्य :-
* मेरी संसदीय यात्रा ( चार खंड)

* मेरी इक्यावन कवितायें (कवितासंग्रह)
* संकल्प काल
* शक्ती से शांन्ती
* Four Decades in Parliament (भाषणांचे ३ खंड)
* लोकसभा मे अटलजी (भाषणांचा सग्रह)
* मृत्यू या हत्या
* अमर बलिदान
* कैदी कविराज की कुंडलिया(आणीबाणीच्या काळात तुरुंगात लिहिलेल्या कविता)
* New Dimensions of India’s Foreign Policy (a collection of speeches delivered as External Affairs Minister during 1977-79)
* जनसंघ और मुसलमान
* संसद मे तीन दशक (speeches in Parliament – 1957-1992 – three volumes
* अमर आग है (कविता सग्रह)
* न दैन्यं न पलायनम्‌ (कविता संग्रह)