मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ‘या’ चौघांना उच्च न्यायालयाकडून जामिन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याशी संबंधित मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील ४ आरोपींना मुंबई उच्चन्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शुक्रवारी सकाळी उच्चन्यायालयाने याबाबतचा निर्णय देऊन या प्रकरणात आरोपी असलेल्या लोकेश शर्मा, राजेंद्र चौधरी, धन सिंह आणि मनोहर नरवारिया या चार आरोपींना जामीन मंजूर केला.

या आधी मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात भोपाळच्या आताच्या खासदार भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांना शुक्रवारी विशेप एनआईए न्यायालयात हजर राहिल्या होत्या. त्यावेळी आपल्याला २००८ साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटाबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच प्रकरणातील दुसरा आरोपी सुधाकर द्विवेदी याने देखील न्यायालयात अशीच माहिती दिली.

विशेष न्यायालय या प्रकरणाची सुनावणी २९ सप्टेंबर २००८ पासून होत आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये जुम्मा निमित्त नमाज चालू असताना मास्जिद जवळ स्फोट झाला, यात ६ लोकांची हत्त्या झाली आणि १०० पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले.

साध्वींना क्लीनचीट परंतू प्रकरणातून मु्क्त करण्यास नकार
प्रज्ञा ठाकूर यांच्याशिवाय या प्रकरणात द्विवेदी आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना देखील आरोपी ठरवण्यात आले होते. एनआईए न्यायालयाने साध्वी प्रज्ञाला क्लीन चिट दिली आहे. असे असले तरी एनआईएचे विशेष न्यायालय प्रज्ञा सिंह यांना या प्रकरणातून मुक्त करण्यास तयार नाही.

प्रज्ञा आणि इतर आरोपी यांच्यावर बेकायदा कारस्थाने करणे हा आधिनियम, स्फोट आधिनियम आणि भारतीय दंड सहिता आधिनियमानुसार खटला दाखल करण्यात आला आहे. न्यायालय महाराष्ट्रातील कायदा मोकाच्या अंतर्गत यात लावण्यात आलेल्या आरोपातून या सर्वांची मुक्तता केली आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या व्यतिरिक्त हे आहेत इतर आरोपी
एनआईएच्या आरोप पत्रात प्रज्ञा ठाकूर, पुरोहित आणि द्विवेदी या मुख्य आरोपींशिवय १४ इतर लोकांची देखील नावे होती. यात मेजर रमेश उपाध्यय, समीर कुलकर्णी, राकेश धवाडे, प्रवीण तकालकी आणि सुधाकर चतुर्वेदी यांचा समावेश आहे. या प्रकरणात शिवनारायण कलसांग्रा, शाम साहूस अजय राहिरकर आणि जगदीश म्हात्रे यांनी या आधीच जामीन मिळाला आहे. तर या प्रकरणातील इतर आरोपी संदीप डांगे आणि रामचंद्र कलसांग्रा फरार आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

जागतिक रक्तदान दिन : गरिबांचा कैवारी ‘अनिल लुणिया’

किहोल सर्जरी ‘ब्रेन ट्युमर’ काढण्यासाठी फायदेशीर

जाणून घ्या ‘केमोथेरेपी’ म्हणजे नेमकं काय ?

You might also like