दिघीतून चार गुन्हेगार दोन वर्षासाठी हद्दपार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हेगारांना हद्दपार करण्याची मोहीम हाती घेतली असून वाकड पोलिसानंतर दिघी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. दिघी परिसरात दहशत माजविणा-या चार जणांच्या टोळीला पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’51592ae2-cee9-11e8-b257-413ead7cefb3′]
अनिकेत हेमराज वाणी (१९, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), अमर विनायक माने (१९, रा. दिघी रोड), निखील रामचंद्र डाबळे (१९, रा. सावंतरनगर, दिघी) आणि मंगेश शुक्राचार्य मोरे (१९, रा. आळंदी दिघी रोड, भोसरी) अशी हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

[amazon_link asins=’B077S3Y5MQ,B073JW8LNK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’723c33fa-cee9-11e8-8a24-e5eb2601caa1′]
हद्दपार केलेल्यानी गेल्या दोन वर्षांपासून दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे केले आहेत. दिघी परिसरात त्यांची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आरोपींवरील सर्व गुन्ह्यांचे रेकॉर्ड जमा करुन तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार या चार जणांच्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. हि कामगिरी उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस निरीक्षक खंडेराव खेरे, सध्याचे निरीक्षक विवेक लावंड आणि त्यांच्या पथकाने केली.