राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या बारामतीमधील बंगल्यातील चौघांना ‘कोरोना’ची लागण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमधील बंगल्यात काम करणार्‍या चौघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पीटीआय वृत्तसंस्थेनं ट्विट केलं आहे. यापुर्वी शरद पवार यांच्या मुंबईतील सिव्हर ओक बंगल्यातील काही जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर शरद पवार यांची देखील कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यावेळी दिली आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या बारामतीमधील बंगल्यात काम करणार्‍या चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याबाबत जिल्हा प्रशासनानं दुजोरा दिला आहे. पुणे शहर आणि पुणे जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. दरम्यान, पुणे शहर अणि जिल्हयातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समोर येणार्‍या आकडेवारीवरून दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वी पुणे विभागाचे आयुक्त सौरव राव यांनी पुणे शहरातील कोरोना नियंत्रणात आहे तर जिल्हयातील परिस्थिती काहीशी गंभीर असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर देखील पुणे जिल्हयातील कोरोनाचा फैलाव वाढत आहे. स्थानिक प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या बारामती येथील बंगल्यात काम करणार्‍या चौघांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.