डॉक्टर तरूणीवर बलात्कार करून खून, ‘पोस्टमार्टम’ रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उजेडात, चौघांना अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २७ वर्षीय डॉक्टर प्रियांका रेड्डी हिच्यावर बलात्कार करून तिला मृतदेह जाळून टाकण्यात आला होता. याबाबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर देशभरातून याबाबत मोठी हळहळ व्यक्त केली जात होती. तेलंगणाच्या रंगा रेड्डी या जिल्ह्यातील हा खळबळजनक प्रकार असून पोलिसांनी यासंबंधी चार आरोपींलना अटक करण्यात यश मिळवले आहे.

पोस्टमार्टम मध्ये काही धक्कादायक गोष्टी समोर आली आहेत. पेशाने व्हेटर्नरी डॉक्टर असलेल्या प्रियांकावर ४ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे अहवालात समोर आले आहे. बुधवारी रात्री ९.३० वाजल्यापासून ते गुरुवारी पहाटे ४ वाजेपर्यंत प्रियांकावर अत्याचार करण्यात आले. यावेळी प्रियंकाला जवळजवळ ७ तास बांधून ठेवण्यात आले होते. चारही आरोपींकडून प्रियंकाला मोठ्या प्रमाणावर टॉर्चर करण्यात आल्याचे देखील अहवालात म्हटले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून ट्रक ड्रायव्हरसह त्यांच्या क्लिनर्सनी प्रियांकावर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे समजते. राष्ट्रीय महिला आयोगाने यामध्ये आक्रमकता दाखवल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित अधिकाऱ्यांना हैद्राबादला पाठवल्याचे समजते.

प्रियांकाची स्कुटर शानदार टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. यावेळी तिने आपल्या बहिणीला फोन केला आणि मला या ठिकाणी भीती वाटत असल्याचे सांगितले आणि फोन कट झाला. यानंतर थेट प्रियांकाचा मृतदेह सापडल्याने मधल्या काळात तिच्यासोबत नेमके काय झाले याचे उत्तर पोलीस शोधात होते

प्रियांका ही पेशाने पशु वैद्यकीय क्षेत्रात होती. कोल्लूर येथील जनावरांच्या दवाखान्यात जाण्यासाठी ती आपल्या घरून निघाली होती. टोलनाक्याजवळ आल्यावर तिने गाडी तेथेच लावली आणि टॅक्सी करून कामावर गेली. मात्र कामावरून येताना स्कुटर पंक्चर असल्याचे तिच्या लक्षात आले. तेव्हा तिने बहिणीला फोन करून याबाबत सांगितले तेव्हा बहिणीने तिला टॅक्सी करून घरी ये असे सुचवले. मात्र प्रियंकाने काही लोक माझी मदत करत आहेत असे सांगितले आणि फोन ठेवला. त्यानंतर तिचा फोन बंद पडला होता.

त्यानंतर एका दुधवाल्याला जळालेला मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी कुटुंबियांना बोलावून अधिक तपास सुरु केला होता. घटनास्थळी कुटुंबियांना प्रियांकाची चप्पल आणि स्कार्फ देखील मिळाला होता. त्यावरूनच पोलिसांनी अधिक तपास केला.

प्रियांकाच्या या धक्कादायक मृत्यू नंतर ट्विटरवर #RippriyankaReddy हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर ट्रेंडींगमध्ये आला असून या घटनेबाबत अनेकांकडून खेद व्यक्त केला जात आहे.

Visit : Policenama.com