राष्ट्रीय

18 व्या मजल्यावरून पडला 4 वर्षाचा बालक, पण ‘ज्याला देव तारी त्याला कोण मारी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – असं म्हणतात की, देव ज्याला वाचवू इच्छित आहे त्याला कोणी मारू शकत नाही. एका चार वर्षांच्या मुलासह देखील असेच काही घडले. मुलगा १८ व्या मजल्यावरील आपल्या फ्लॅटच्या खिडकीतून खाली पडला, पण चमत्कार म्हणजे तो वाचला.

चीनच्या हुबेई प्रांतातील शियांगयांग येथे एक चार वर्षांचा मुलगा त्याच्या घरी एकटा होता. आई – वडील बाहेर गेले होते. तो सोफ्यावर चढला आणि १८० फूट खाली पडला. ही घटना ६ ऑगस्टची आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, खाली असलेल्या झाडावर पडल्याने तो वाचला असे डॉक्टरांनी सांगितले. पण तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, पण त्याची प्रकृती स्थिर आहे.

गंभीर जखमी झालेले हे मूल घरी आजीबरोबर राहत होते. कारण त्याचे आई-वडील दुसर्‍या शहरात नोकरी करतात. एकटा खेळत असताना तो खिडकीतून खाली पडला. त्याची आजी घरातील सामान आणण्यासाठी बाहेर गेली होती.

मुलाच्या पालकांना आपत्कालीन सेवेचा फोन आला. मुलाच्या वडिलांनी त्यांच्या आईला धक्का बसल्याचे सांगितले. ती काहीही करू शकत नव्हती. पण काही अनोळखी व्यक्तींनी रुग्णवाहिकेतून मुलाला रुग्णालयात नेले.

त्याला बऱ्याच ठिकाणी गंभीर जखम झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. ते आता आयसीयूमध्ये आहे. पण त्याची प्रकृती स्थिर आहे. मुलावर उपचार करणारे डॉ. चेन शी म्हणाले की, हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.

मुलासाठी तात्काळ आपत्कालीन प्रोटोकॉल तयार केला गेला. मुलाची शस्त्रक्रिया करण्यासाठी ६ वेगवेगळ्या विभागांचे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी बाळाची प्रकृती सुधारू लागली.

Back to top button