PMC बँक घोटाळा : ‘वैद्यकीय’ उपचारासाठी पैसे न मिळाल्याने खातेदाराचा मृत्यू, आत्तापर्यंत 4 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा वैद्यकीय उपाचारासाठी पैसे न मिळाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलुंड येथे राहणारे मुरलीधर धर्रा यांचा आज मृत्यू झाला. मुरलीधर यांचे पीएमसी बँकेत खाते असून ते आजारी होतो. त्यांचा मुलगा पीएमसी बँकेत पैसे काढण्यासाठी गेला होता. मात्र, त्याला बँकेतून पैसे मिळाले नाहीत. पैसे मिळाले नसल्याने मुरलीधर यांच्यावर वैद्यकीय उपचार करता आले नाहीत, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मागील आठवड्याभरात पीएमसी बँक खातेदारांपैकी चौथ्या खातेदाराचा मृत्यू झाला.

काही दिवसांपूर्वी संजय गुलाटी (वय-51) आणि फत्तेमुल पंजाबी (वय-59) यांचा मृत्यू झाला. पीएमसी बँकेत लाखो रुपये अडकून राहिल्याने मानसिक तणावातून हृदयविकाराच्या झटक्यांनी दोघांचा मृत्यू झाला. तर पीएमसी बँकेत 1 कोटी रुपये असलेले खातेदार डॉ. योगिता बिजलाना यांनी राहत्या घरामध्ये आत्महत्या केली. अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहणाऱ्या डॉ. बिजलानी यांनी झोपेच्या गोळ्यांचं अतिसेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.

पंजाब अँड महाराष्ट्र बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज बँकेचे माजी संचालक सुरजितसिंग अरोरा यांना अटक केली. या घोटाळ्यातील ही पाचवी अटक असून बँकेचे आणखी ११ संचालक पोलिसांच्या रडारवर आहेत. अरोरा हे पीएमसी बँकेचे संचालक होते तसेच कर्ज मंजुरी व वितरण समितीतही त्यांचा समावेश होता.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी