पोलीस भरतीचे अमिष दाखवून अडीच लाखांचा गंडा

सातारा : पोलीसनामा आॅनलाईन 

पोलीस खात्यामध्ये भरती करण्याचे अमिष दाखवून तब्बल अडीच लाखाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. संदीप सोपान गायकवाड (रा. करंजे पेठ) असे फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. जितेंद्र सर्जेराव पाटील (वय-25 रा. नाटेली, ता. शिराळा, जि. सातारा.) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सदर इसमाच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिराळा येथील जितेंद्र पाटील याला पोलीस दलात भरती होण्याची इच्छा होती. याची माहिती त्याचे दाजी गोरख यादव यांना असल्याने त्यांच्या अोळखीचे बाळासाहेब रेडेकर यांना सांगितले होते. रेडेकर यांनी त्यांना संदीप गायकवाड हा पैसे घेऊन पोलीस दलात भरती करण्याचे काम करत असल्याचे सांगितले. यानंतर जितेंद्र याने संदीप गायकवाड याच्याशी संपर्क साधून साताऱ्यातील एका हाॅटेलमध्ये भेट घेतली. यावेळी हे काम करण्यासाठी गायकवाडने तीन लाख रुपये लागतील, असे सांगितले.

[amazon_link asins=’B07DYRP5YD’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2a649fac-7c52-11e8-aaae-c1338f9995b1′]

जितेंद्र याने त्याच्या दाजीच्या खात्यावरुन अनेकदा गायकवाड याच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले. अनेक दिवस वाट पाहिल्यानंतर देखील भरतीचे काम झाले नसल्याने जितेंद्रने संदीपला विचारणा केली. यावर संदीपने तुझे काम रेल्वेत होणार असल्यामुळे उशीर होत आहे असे म्हटले. रेल्वे भरतीची तारीख निघून गेल्यानंतर संदीपने टोलवा टोलवी करायला सुरूवात केली. त्यानंतर जितेंद्रने मला भरती व्हायचे नसून दिलेले अडीच लाख रुपये परत मागितले. त्यानंतर देखील संदीप याने जितेंद्र पाटील याला थापा मारण्यास सुरूवात केली. यावरुन संदीप पाटील याने गायकवाडच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.