लग्‍नाच्या 2 महिन्यानंतर पत्नीला सासरवाडीतून आणण्यास गेला खरा, ‘सत्यकथा’ समजल्यानंतर ‘स्तब्ध’ झाला

लखनऊ : वृत्तसंस्था – सध्या लग्न या परंपरेला काळीमा फासनाऱ्या घटना घडत आहेत. त्यामुळे अनेकदा लोकांचा लग्नावरून विश्वासच उडत असतो. तसंच लग्नाच्या नावाखाली अनेकदा लोकांचा विश्वासघात केला जातो. लखनऊमधील अमशाह मधील एका गावात असाच काहीसा प्रकार घडला आहे.

अमशाह येथे राहणारे छेदालाल यांना लग्नाच्या नावाखाली विश्वासघात करत लुबाडण्यात आले आहे. छेदालाल यांच्या पहिल्या पत्नी नीरजा यांचा ४ वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. त्यामुले आणि छोदालाल यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगी होती. मुलीच्या संगोपनासाठी त्यांनी दुसऱ्या लग्नाची इच्छा व्यक्त केली. तर त्याच गावातील एका व्यक्तीच्या भावाने यासाठी पुढाकार दाखवला. ही व्यक्ती बरेली येथील रहीवासी होता.
fraud-Marraige
हा व्यक्ती छेदालाल यांच्या घरी येऊन त्यांना लग्नासाठी विचारले. आपली मेहूणी आणि तिचा नवरा यांचा मृत्यू झाला असून त्यांची मुलगी प्रियंका आपल्याकडेच राहत असल्याचे सांगितले. या प्रियंकाबद्दल त्यांनी लग्नासाठी छेदालाल यांना विचारणा केली. त्यावर छेदालाल यांनी होकार दिला. लग्नाच्या खर्चासाठी त्या व्यक्तीने छेदालाल यांच्याकडून ३८ हजार रुपये उकळले.

आरोपी व्यक्तीने दोघांचे २५ मे ला लग्न लावून दिले. त्यानंतर २२ जुलैला छेदालाल यांना आपल्या पत्नीच्या स्वास्थ्याचे कारण देत त्या व्यक्तीने प्रियंकाला बोलवण्याबाबत विचारणा केली. त्यावर छेदालाल यांनी पत्नीला पाठवले.

प्रियंकाला पाठवल्यापासून तिचा काहीही संपर्क न झाल्याने छेदालाल हा त्या व्यक्तीच्या घरी गेला. मात्र तेथे गेल्यावर त्याला धक्काच बसला. तो व्यक्ती घराला कुलूप लावून निघून गेला होता. त्यानंतर तो तेथे भाड्याने राहत असल्याची माहिती समोर आली. तसंच या व्यक्तीने घर खाली करून निघून गेल्याची माहिती घरमालकाने दिली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे छेदालाल यांच्या लक्षात आले.

आरोग्यविषयक वृत्त