पुण्यातील नामांकित हॉस्पीटलमधील महिला डॉक्टरला ‘फेसबुक’वरील ‘मैत्री’ पडली महागात !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील नामांकित रुग्णालयातील ट्रेनी डॉक्टरसोबत फेसबुकवर मैत्री करुन तिला प्रेमात गुंतवून ९ लाख १७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १८ मे ते २६ जून दरम्यान रुग्णालयात घडला. याप्रकरणी २५ वर्षीय ट्रेनी डॉक्टरने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका महिलेसह वेगवेगळ्या बँकेच्या खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी तरुणी ही पुण्यातील नामांकित रुग्णालयात ट्रेनी डॉक्टर आहे. तरुणीच्या व्हॉट्सअॅपवर हर्षा चेरुकुरी या खोट्या नावाने चॅटींग करून एका भामट्याने तिच्याशी मैत्री केली. हर्षा याने या तरुणीला आपले आई-वडील हे डॉक्टर असून ते अमेरिकेला असल्याचे सांगितले. तसेच त्याने एका अपंग मुलीला दत्तक घेतल्याचे तिला सांगितले.

अशाप्रकरे त्याने तरुणीशी ओळख वाढवून प्रेम करत असल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्याच्या प्रेमाला होकार दिला. यानंतर दोघांमध्ये अनेकवेळा चॅटींग झाले. यावरुन तो चांगला मुलगा असल्याचा विश्वास तरुणीला बसला.

काही दिवसांनी हर्षा चेरुकुरीने तिच्याशी संपर्क करून सामाजिक कामासाठी पैसे लागत असल्याचे भासवत विविध संस्था तसेच खात्यांवर पैसे पाठवण्यास सांगितले. अशाप्रकारे त्याने तरुणीकडून ९ लाख १७ हजार रुपये उकळले. तरुणीने तिच्याकडे पैसे नसल्याने भावाकडून आणि मित्र मैत्रीणीकडून पैसे घेऊन हर्षाला दिले.

तरुणीला संशय आल्याने तिने ६ जून रोजी हर्षाचे अकाऊंट तपासले असता त्यावर हर्षा चेरुकुरी नावाचे एक फेक अकाऊंट असून त्याद्वारे तरुणींना फसविले जात असल्याचे लिहले होते. तसेच हे फेक अकाऊंट वामसी जोगाडा या व्यक्तीचे असल्याचे समजले. तसेच जोगाडा याला काकीनाडा येथील टु टाऊन पोलीसांनी अटक केल्याचे लिहीले होते.

यावरुन तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास अलंकार पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्पना जाधव करीत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

पौरुषत्व कायम ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण आयुर्वेदीक उपाय

‘हे’ घरगुती उपाय केल्यास नाभी इन्फेक्शन होऊ शकते दूर

पहाटे सेक्स केल्याने हार्ट अटॅकचा धोका होतो कमी

पपईच्या रस प्यायल्याने होतात ‘हे’ ७ फायदे