‘ओएलएक्स’वरुन (OLX) कार खरेदी करणे पडले महागात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – झटपट विका किंवा खरेदी करा अशी जाहिरात केल्या जात असलेल्या ओ एल एक्स या खरेदी विक्रीच्या साईटचा गैरफायदा घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्याच्या फटका काळेवाडी येथील तरुणाला बसला. पैसे तर गेलेच पण, कारही मिळाली नाही.

याप्रकरणी मयुर दिलीप चव्हाण (वय १९, रा. तापकीरनगर, काळेवाडी) याने वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २१ ते २३ जानेवारी दरम्यान घडला.

सोन्याच्या बिस्किटासाठी तिने दिले गळ्यातील मंगळसुत्र काढून 

शिक्षण घेत असलेल्या मयुर यांनी कार चालविण्यास शिकल्यानंतर सुरुवातीला जुन्या कारवर हात साफ करुन घेण्याचे ठरविले. त्याच वेळी त्यांना ओ एल एक्स वर एक मारुती स्विप्ट डिझायर कार विकायची असल्याची जाहिरात दिसली. त्यावर तामीर तेजकुमार या अहमदाबाद येथे राहणाऱ्याचा मोबाईल क्रमांक होता.  त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर त्याचे कल्लु व राम या साथीदारांशी बोलणी झाली. त्यांनी दोन बँक खात्याचे क्रमांक देऊन त्यावर २ लाख २४ हजार ९९५ रुपये आनलाईन ट्रांझेक्शन द्वारे भरण्यास सांगितले.
त्यानंतर कार पाठवून देतो, असे सांगितले. त्यावर मयूर यांनी विश्वास ठेवून पैसे ट्रान्सफर केले.

हे पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांनी संबंधितांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर ते मोबाईल बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.