कंपनीचा m.d. असल्याची बतावणी करत बँक मॅनेजरला rtgs करण्यास लावत २१ लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एचडीएफसी बँकेच्या मॅनेजरला फोन करून नामांकित मोटर्स कंपनीचा एमडी असल्याची बतावणी करत अडीच कोटी रुपयांची एफडी करावयाची आहे. तुमच्या बँकेचा मोठा ग्राहक आहे. चेक व फॉर्म पाठवून देतो. एवढे एक्सेप्शन कार असे म्हणत २१ लाख ४५ हजार रुपयांची आरटीजीएस करण्यास लावून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरण अज्ञात मोबाईलधारक व खातेधारक भामट्याविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकऱणी मुकेश लवाटे (वय ४१, कोथरुड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बाणेर पाषाण लिंक रोड वरील एचडीएफसी बँकेत नोकरी करतात. २२ मार्च ते २७ मार्च दरम्यान त्यांना एका व्यक्तीने फोन केला. तो स्वत: एका नामांकित मोटर्स प्रा, लि. कंपनीचा एमडी असल्याची बतावणी केली. त्यानंतर तुमच्या बँकेचा मोठा ग्राहक आहे. अडीच कोटी रुपयांची एफडी करायची आहे. त्याने सांगितले. दरम्यान यावेळी चेक किंवा फॉर्म पाठवू शकलो नाही. त्यामुळे एक्सेप्शन म्हणून माझे एवढे काम करा म्हणत त्यांना २१ लाख ४५ हजार ५७४ रुपये आरटीजीएस करण्यास लावले. त्यानंतर हा फसवणूक झाल्याचे समोर आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक अनुराधा भोसले करत आहेत.