रात्री बाथरुमसाठी वारंवार उठावे लागतं का ? वेळीच सावध व्हा, ‘या’ आजाराला बळी पडू शकता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनेकांना रात्री सतत लघवीला जाण्याची सवय असते. आपल्याला वाटत असेल की, ही गोष्ट सामान्य आहे पण असे नाही. जर तुम्हाला असे होत असेल तर हे आजाराचे लक्षण आहे. आपल्याला असे वाटते की, पाणी जास्त पिल्याने लघवी जास्त होते. पण यामुळे येणारा थकवा आणि निरुत्साहाकडे काणाचे लक्ष जात नाही. जर तुम्हाला रात्री दोनपेक्षा जास्तवेळा बाथरुमला जाण्यासाठी उठावे लागते तर वेळीच सावध व्हा. कारण ही मधुमेह, रक्तदाब, प्रोस्टेट कर्करोग किंवा अन्य मोठ्या आजाराची लक्षण आहेत. त्यामुळे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

जर आधीच तुम्हाला एखादा आजार असेल तर त्यामुळे देखील लघवी सारखी होते. जर तुम्ही रक्तदाबावर औषध-उपचार करत असाल त्यामुळे देखील रात्री वारंवार लघवी येणे हे होऊ शकते. कारण आजारात वारंवार गोळ्या घेतल्यामुळे लघवी सारखी होते. याबरोबरच प्रेग्नेंट महिलांना देखील अशा समस्या होतात. याचे महत्वाचे कारण म्हणजे प्रेग्नेंसीमध्ये यूरेटस मोठे होत असते. यामुळे आपल्या ब्लडवर ताण पडतो. त्यामुळे प्रेग्नेंट महिलांना लघवीला सारखे जावे लागते.

जर तुम्ही काही कारणाशिवाय सतत लघवीला जात असाल तर याचा परिणाम थेट तुमच्या मूत्रपिंडावर होऊ शकतो. त्यामुळे लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही रात्री साधे जेवण करणे गरजेचे आहे. मसालेदार पदार्थ, मद्यपान, कॅफीनसारखे पदार्थ खाणे पुर्णपणे टाळले पाहिजे. याव्यतिरिक्त पेल्विक प्लोर मसल्स आणि ब्लडरला सशक्त करणारे व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही निरोगी रहाल.

Visit : Policenama.com