JNU हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून 9 जणांची नावे जाहीर, स्मृती इराणी म्हणाल्या – ‘डाव्यांचा पर्दाफाश झाला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हिंसाचाराच्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत काही फोटो आणि नावे जाहीर केली आहेत. या प्रकरणात ते अधिक तपास करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपींमध्ये जेएनयू माजी विद्यार्थी चुनचुन कुमार, जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आईशी घोष, डोलन समान्ता, विकास विजय, प्रिया रंजन, सुचेता तालूकदार, पंकज मिश्रा, योगेंद्र भारद्वाज, विकास पटेल अशी नावे आहेत. या विद्यार्थ्यांपैकी 7 लेफ्ट युनिटीचे विद्यार्थी आहेत तर 2 अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आहेत. पोलिसांनी सांगितले की त्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या सहाय्याने या लोकांना ओळखले आहे.

दिल्ली पोलिसांच्या या पत्रकार परिषदानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाकपा, माकप, आप या पक्षांना नाकारण्यात आले होते, आता ते विद्यार्थ्यांना आपल्या स्वार्थासाठी वापरत आहेत. ते म्हणाले की, जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन संपवून शैक्षणिक सत्र सुरू करावे. जावडेकर म्हणाले की, पोलिसांनी सत्य बाहेर आणले, डाव्या विचारसरणीत विद्यार्थी संघटना या हल्ल्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्याचवेळी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विट केले की, ‘जेएनयूमध्ये डावा मुखवटा हटविला गेला आहे. त्यांनी हिंसाचाराच्या गर्दीचे नेतृत्व केले, करदात्यांच्या पैशाने निर्माण झालेल्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले, नवीन विद्यार्थ्यांना नावनोंदणी करण्यास रोखले, महाविद्यालयाच्या आवारात राजकारणाचा आखाडा म्हणून त्यांचा उपयोग केला. दिल्ली पोलिसांचे पुरावे जाहीर केल्यानंतर जेएनयूमधील हिंसाचाराचा मागे डाव्या विचारसरणीच्या लोकांचा हात होता हे जनतेसमोर आले आहे.

दरम्यान, 5 जानेवारी रोजी काही मुखवटा घातलेल्या लोकांनी युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/