WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत रूग्णवाहीकेच्या देखभालीसाठी 5001 चा निधी

लासलगाव – “आम्ही खडकमाळेगावकर”व्हॉटसअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या नूतन विद्यालय खडकमाळेगाव येथे सन २००४ ला इयत्ता दहावीला एकत्र असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त एकत्र येत गावातील रूग्णांच्या सेवेसाठी असलेल्या सार्वजनिक रूग्णवाहीकेच्या देखभाल दुरूस्ती व वाहन विम्यासाठी ५००१ रूपये रक्कम देऊन सोशल मिडियाचा विधायक वापर कसा करावा याचे आदर्श उदाहरण तरूणांपुढे ठेवले.

यशवंतराव चव्हाण विद्यापीठ नाशिक व खडकमाळेगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नाने खडकमाळेगाव गावासाठी गेल्या अनेक वर्षांपासून रूग्णवाहीका कार्यरत आहे.. या रूग्णवाहीकेचे रूग्णसेवक हभप निवृत्तीबाबा शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून वर्षभर २४ तास विनामूल्य सेवा ग्रामस्थांना देत असतात त्याबद्दलही आम्ही खडकमाळेगावकर समूहातर्फे त्यांचा सत्कार करून आभार मानले..

यावेळी आम्ही खडकमाळेगावकर व्हॉटसअ‍ॅप समुहाचे अनिल रायते, नितीन मोहिते, हेमंत शिंदे, मनोज रायते, महेश जाधव, महेश रायते,दीपक चव्हाण,नंदू रायते,संदीप भोसले,मधुकर घोलप उपस्थित होते.

You might also like