संपुर्ण रस्ता ‘जलमय’, छातीपर्यंत पाणी आलं असताना देखील काढली ‘अंत्ययात्रा’

मध्यप्रदेश : वृत्तसंस्था – देशातील विविध राज्यांमध्ये अति पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्यप्रदेशातील ५२ पैकी ३३ जिल्हे पुराच्या सपाट्यात सापडले आहेत. राज्यात एक हरदा नावाचा जिल्हा आहे. येथील परिस्थिती एवढी वाईट आहे की, घरापासून स्मशानभूमीपर्यंत पाणीच पाणी आहे. या पाण्यातून येथे एक अंत्ययात्रा काढण्यात आली. त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हा प्रकार हरदा जिल्ह्यातील पिडगाव मध्ये घडला आहे.

पानी से लबालब सड़क, सीने तक डूबकर लोगों ने निकाली शवयात्रा

छातीभर पाण्यातून अंत्ययात्रा –

मध्यप्रदेशातील हरदा जिल्ह्यात पुराची पुराची परिस्थिती अतिशय गंभीर असल्यामुळे येथे एक अंत्ययात्रा काढण्यासाठी गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. जवळ- जवळ छाती इतक्या पाण्यातून अंत्ययात्रा काढली गेली. त्याचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोमवार ९ सप्टेंबर रोजीचा आहे.

पानी से लबालब सड़क, सीने तक डूबकर लोगों ने निकाली शवयात्रा

अंत्ययात्रेच्या व्हिडीओ व्हायरल –

मध्यप्रदेशातील हरदा जिल्ह्यात अति पावसामुळे तुडुंब पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून एक अंत्ययात्रा काढली गेली. सोमवारी जिल्ह्यातील सुखनी नदीला पूर आला होता. या गावात एका राहुल नावाच्या २० वर्षाच्या मुलाचा आजारामुळे मृत्यू झाला होता. सोमवारी संततधार पावसामुळे गावामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. जोरात पडत असलेल्या पावसात गावातील लोकांनी अंत्ययात्रा काढली आणि अंतिम संस्कार केले. या दरम्यान गावातील एका मुलाने याचा व्हिडीओ तयार करून तो समाजमाध्यमांवर व्हायरल केला आहे.

पानी से लबालब सड़क, सीने तक डूबकर लोगों ने निकाली शवयात्रा

आरोग्यविषयक वृत्त –