‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा मीजान जाफरी हा चित्रपट ‘मलाल’ मधून बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून पदार्पण करत आहे. पण टेक्नोलॉजीमधून पाहिले तर या अभिनेत्याने संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटात काम केले आहे. दोन सीनमध्ये तो दिसून आला आहे.

https://www.instagram.com/p/BefEnd6BNeQ/

खरतर, अभिनेता मीजानने संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ च्या सेटवर असिस्टेंट म्हणून काम केले होते. त्याचबरोबर रणवीरच्या जागी देखील त्याने काम केले होते. एका चॅट शो मध्ये या गोष्टींचा खुलासा झाला. मीजानने सांगितले की, एका ब्रॅंडच्या शूटसाठी रणवीर सिंहला बाहेर जायचे होते. त्याचवेळी काही महत्वाचे शूट करणे गरजेचे होते.

https://www.instagram.com/p/BgbAEM0BrjB/

शूटिंगमध्ये खंड पडू नये म्हणून संजय लीला भन्साळी यांना एक आयडिया सुचली. त्यांनी मीजानचा रणवीर सिंहसारखा हुबेहुब गेटअप केला आणि शूट करुन घेतले. मीजान म्हणला की, त्याला सेटवर रणवीर सिंहचे हावभाव शिकवले गेले होते. चित्रपटात काही दोन सीन असे आहेत ज्यामध्ये रणवीर सिंहच्या जागी मीजान आहे.

https://www.instagram.com/p/Be0FAA3Bfks/

मीजानचा लुक आणि त्याची पर्सनॅलिटी सेम रणवीर सिंहसारखी आहे. आता पहायचे हे आहे की, अभिनेता मीजान ‘मलाल’ चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकतो की नाही. मीजानचा ‘मलाल’ चित्रपट ५ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

https://www.instagram.com/p/Be1zywbhHS0/

आरोग्यविषयक वृत्त

वेळ नसेल तर … फिटनेससाठी सूर्यनमस्कारही पुरेसे

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

तुमचे आरोग्य कसे आहे ? याचे उत्तर देईल तुमची जीभ

कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना हाफकिनमध्ये निवारा

मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची

ब्लड ऑन कॉलवर विधानसभेत चर्चा, आरोग्य मंत्र्यांनी दिले उत्तर

सिने जगत

मोगॅम्बो खुश हुवा ! गुगलचे ‘डुडल’ द्वारे खल’नायक’ अमरीश पुरी यांना अभिवादन

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’