गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट करुन पोलीस व्हॅन उडवली ; १५ जवान शहीद

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – नक्षलवाद्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा डांबर प्लॉंट व ३६ हून अधिक गाड्या जाळल्यांची घटना पहाटे घडल्यानंतर त्या ठिकाणी जात असलेल्या पोलीस पथकाची गाडी बॉम्बस्फोट करुन उडवून लावल्याची घटना घडली आहे. ही घटना कुरखेडा तालुक्यातील पुराडा मार्गावर घडली आहे. दरम्यान, या घटनेत १५ हून अधिक जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नक्षलवाद्यांनी डांबर प्लॉंट व काही गाड्या पेटवून दिल्याची घटना समजल्यानंतर पोलीस एका खासगी वाहनातून जात होते. नक्षलवाद्यांनी या वाहनाला लक्ष्य करीत रस्त्यात भूसुरुंग पेरुन वाहन येताच तो उडवून दिला. त्यात या गाडीचा संपूर्ण चेंदामेंदा झाला असून काही पोलीस ठार झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.