गडकरी माझे मोठे बंधू, त्यांच्या आशीर्वादाने 4 लाख मतांनी विजयी होणार : काँग्रेस उमेदवाराचे वक्तव्य

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे माझे मोठे बंधू आहेत, त्यांच्या आशीर्वादाने मी चार लाख मतांनी विजयी होईन. असे नागपूर काँग्रेसचे लोकसभा उमेदवार नाना पटोले यांनी म्हंटले आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सर्व पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत. दरम्यान काँग्रेसने नागपूर लोकसभा मतदार संघातून नाना पटोले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला. त्यावेळी, काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे यावेळी नागपूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसचाच झेंडा फडकवण्यासाठी काँग्रेस एक दिलाने काम करेल. इतकेच नव्हे तर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे माझे मोठे बंधू आहेत, त्यांच्या आशीर्वादाने मी चार लाख मतांनी विजयी होईन. असेही त्यांनी म्हंटले.

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असता, त्यामध्ये नागपूर लोकसभा मतदार संघातून नाना पटोले यांचे नाव जाहीर केले. दरम्यान, शुक्रवारी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले असता, स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोलताशाच्या गजरात स्वागत केले. यावेळी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ह्याही बातम्या वाचा –

#Loksabha : तुल्यबळ उमेदवाराच्या शोधासाठी रोहित पवार नगरमध्ये दाखल