मोदी सरकारमधील आणखी एका केंद्रीय मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण, केलं हॉस्पीटलमध्ये दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 28 लाखांपेक्षा अधिक वाढला आहे. कोरोनाच्या विळख्यात अनेक व्हीआयपी लोक देखील अडकले आहेत. मोदी सरकारच्या अजून एका मंत्र्यांचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या आधी गृह मंत्री अमित शाह, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना कोरोनाची लागण झाली होती.

गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले, ‘मला अस्वस्थ वाटत होते म्हणून मी कोरोना चाचणी केली असता ती पॉसिटीव्ह आली. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी हॉस्पिटल मध्ये दाखल होत आहे. माझी विनंती आहे की मागच्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करून घ्यावी. सगळेजण सुरक्षित राहा.’

कोरोनाच्या विळख्यात अनेक व्हीआयपी लोक देखील अडकले आहेत, त्यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, श्रीपाद नाईक, अर्जुन राम मेघवाल यांचा अहवाल देखील पॉजिटिव्ह आला होता. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आत्तापर्यंत देशातील 28 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील 24 तासात कोरोनाचे आत्तापर्यंतचे सर्वात जास्त म्हणजे 69652 पॉजिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

याआधी एका दिवसात भारतात इतके कोरोनाची रुग्ण आढळून आले नव्हते. तर आत्तापर्यंत 54 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात कोरोना रुग्णांनाचा रिकव्हरी रेट चांगला आहे. आत्तापर्यंत 21 लाख लोक यातून बरे झाले आहेत.