रेकॉर्डब्रेक ! 1 लाख 65 हजारांचा फोन अवघ्या अर्ध्या तासातच झाला ‘आऊट ऑफ स्टॉक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी आली असली तरी मोबाईल क्षेत्रात मात्र फोनची दणदणीत विक्री सुरु आहे. Samsung चा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Fold ने विक्रीमध्ये नवीन रेकॉर्ड केले आहे. प्री-बुकिंगला सुरुवात होताच वघ्या 30 मिनिटांमध्ये 1600 फोनची विक्री होऊन हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला आहे. विशेष म्हणजे प्री-बुकिंगसाठी ग्राहकांना सर्व 1 लाख 65 हजार रुपये आगाऊ भरायचे होते.

शुक्रवारी 11ऑक्टोबर रोजी Samsung चा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Fold साठी प्री-बुकिंग उपलब्ध करून दिली होती. ग्राहकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला. प्री-बुकिंगला सुरुवात होताच अवघ्या अर्ध्या तासात एक हजार सहाशे फोनची विक्री होऊन हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला आहे. प्री-बुकिंग करण्यात आलेल्या ग्राहकांना 20 ऑक्टोबर रोजी फोनची डिलीव्हरी मिळणार आहे.

फीचर्स –

मेमरी -12 जीबी रॅम / 512 जीबी इंटरनल स्टोरेज
प्रोसेसर – ऑक्टा-कोर एसओसी
ऑपरेटिंग सिस्टिम – One UI (अँड्रॉइड 9)

कॅमेरा
रिअर कॅमेरा – ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप (16, 12 आणि 12 मेगापिक्सल )
फ्रंट कॅमेरा – 10 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सचा ड्युअल कॅमेरा सेटअप

डिस्प्ले
पहिला डिस्प्ले – 4.6 इंच , सुपर AMOLED डिस्प्ले (840×1960 पिक्सल रिझोल्यूशन, आस्पेक्ट रेशियो 21:9)
दुसरा डिस्प्ले – 7.3 इंच , इनफिनिटी फ्लेक्स डायनॅमिक AMOLED पॅनल डिस्प्ले.

 

Visit : Policenama.com