‘या’ मुस्लिम देशाच्या नोटांवर गणपती ‘विराजमान’, जाणून घ्या गणेशजींचं या देशाशी काय नातं ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिंदू धर्मात गणपतीला आराध्यदैवत मानले जाते. सर्व देवांमध्ये पहिला पूजेचा मान हा गणपतीचा असतो. त्यामुळे आज गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही तुम्हाला गणपतीविषयी अनेक खास गोष्टी सांगणार आहोत. तुम्ही गणपतीचा फोटो नोटांवर कधी पहिला आहे का? मात्र आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्या देशाच्या नोटेवर गणपतीचे चित्र आहे त्या देशाबद्दल, ते का आहे आणि त्याच्यामागील कारण काय आहे हे आपण जाणून घेऊयात…

जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश असलेल्या इंडोनेशियाच्या नोटांवर गणपतीचे चित्र आहे. याठिकाणी देखील भारताप्रमाणे मुद्रा असून येथील नोटांना देखील रुपया म्हटले जाते. इंडोनेशियात जवळपास 87.5 टक्के नागरिक हे मुस्लिम असून फक्त 3 टक्के हिंदू या देशात राहतात. येथील 20 हजार रुपयांच्या नोटेवर गणपतीचा फोटो असून येथे गणपतीला शिक्षा, कला आणि विज्ञानाची देवता मानण्यात येते.

नोटेत काय खास –

या 20 हजार रुपयांच्या नोटेवर पुढे गणपतीचे चित्र असून मागे क्लासरुमचे छायाचित्र आहे. त्याचबरोबर नोटेवर इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्रा यांचा देखील फोटो आहे.

हे देखील एक कारण –

मागील काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात खालावली होती. त्यानंतर छापण्यात आलेल्या 20 हजार रुपयांच्या नोटेवर गणपतीचे छायाचित्र छापण्यात आले. त्यानंतर त्यांच्या अर्थव्यवस्थेत बदल झाल्याचे सांगण्यात येते.

अर्जुन आणि श्रीकृष्णाची मूर्ती देखील –

केवळ नोटांवर गणपतीचे छायाचित्र नसून त्यांच्या लष्कराचा मॅस्कॉट हे हनुमान असून तेथील एका प्रसिद्ध स्थळावर अर्जुन आणि श्रीकृष्णाची मूर्ती देखील लावण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त