Ganeshkhind Road-Pune Metro | गणेशखिंड रस्त्यावरील मेट्रो, उड्डाणपुल आणि रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा ! उच्च न्यायालयाने मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामात अडथळा ठरणारी 72 झाडे काढण्यावरील स्थगिती उठविली

झाडे तोडण्याऐवजी त्यांचे पुर्नरोपण करण्याचा न्यायालयाचा आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ganeshkhind Road-Pune Metro | मेट्रोमार्ग आणि दुमजली उड्डाणपुलासाठी गणेशखिंड रस्ता रुंदीकरणात बाधा ठरणार्‍या ७२ झाडांचे पुर्नरोपण करण्याच्या अटीवर उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) ही झाडे काढण्यास आज परवानगी दिली. यामुळे गणेशखिंड रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. (Ganeshkhind Road-Pune Metro)

गणेशखिंड रस्त्यावर मेट्रो क्र.३ मार्गीकेचे काम सुरू आहे. तसेच या रस्त्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये दुमजली उड्डाणपुल उभारण्यात येत आहे. उड्डाणपुलाच्या या कामामुळे पुलाच्या दुतर्फा राहाणार्‍या रस्त्याची रुंदी कमी असल्याने महापालिकेने विकास आराखड्यानुसार गणेशखिंड रस्ता ४५ मी. रुंद करण्याचे काम हाती घेतले आहे. रस्तारुंदीमुळे बाधित होणार्‍या मिळकतींचा ताबा घेउन रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतू याठिकाणी असलेली झाडे काढण्यास पर्यावरण प्रेमींनी विरोध केल्याने मागील सहा महिन्यांहून अधिक काळ हे काम रखडले होते. त्यामुळे काम सुरू असताना अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरुन वाहतूक सुरू ठेवावी लागत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

दरम्यान, रस्ता रुंदीकरणात बाधीत होणारी झाडे काढण्याचे काम सुरू असताना पर्यावरण प्रेमींनी त्याला विरोध केला. महापालिकेने ही झाडे काढताना तांत्रिक प्रक्रिया राबविली. यावर आक्षेप घेतलेल्या नागरिकांचे म्हणणे ऐकून न घेता एकतर्फी सुनावणीची प्रक्रिया उरकून झाडे काढण्यास सुरूवात केल्याचा आरोप करत परिसर संस्थेच्यावतीने रणजित गाडगीळ यांनी महापालिके विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली.

झाडे काढण्यास स्थगिती देतानाच उच्च न्यायालयाने यावर तज्ज्ञांची समिती नेमून अहवाल
सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने तज्ज्ञांची समिती नेमून समितीने तयार केलेला
अहवाल स्वीकारला. समितीच्या अहवालावरून आज उच्च न्यायालयाने या रस्त्यावरील काढाव्या लागणार्‍या ७२ झाडांचे पुर्नरोपण करण्याच्या अटीवरच स्थगिती उठविली, अशी माहिती महापालिकेच्या विधी अधिकारी निशा चव्हाण यांनी दिली.

आज न्यायालयातील सुनावणीस ऍड. नीशा चव्हाण (Adv Nisha Chavan)
यांच्यासह पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर आणि याचिकाकर्ते रणजीत गाडगीळ देखिल उपस्थित होते.
या झाडांचे पुर्नरोपण करून त्याचा अहवाल देखिल सादर केला जाईल असे प्रतिज्ञापत्र घेतल्यानंतरच न्यायालयाने स्थगिती उठविली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjog Waghere On Shrirang Barne | संजोग वाघेरेंनी सोडले बारणेंवर टीकास्त्र, ”दहा वर्षात
एकही प्रकल्प नाही, कामगार, पर्यटन, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले…”

Murlidhar Mohol Meet Amit Raj Thackeray | पुण्यात मनसे नेते अमित ठाकरेंच्या भेटीनंतर
मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘आत्मविश्वास आणखी वाढला, विजय अधिक सोप्पा झाला’ (Videos)

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली

Pune Estate Broker Arrested On Mumbai Airport | मुंबई विमानतळावर BMW कारमध्ये सापडले US बनावटीचे पिस्तूल अन् काडतुसे, पुण्यातील रिअल इस्टेट ब्रोकर तुषार काळे, सचिन पोटे, आकाश शिंदेला अटक

Shewalwadi Pune Firing Case | पुणे हादरलं, सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार; ‘सिक्युरिटी एजन्सी’च्या वादातून गोळीबार