पुण्यात गणेशोत्सवातील देखावे ‘या’ 6 दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत सादर होणार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी पुण्यात गर्दी होत असते. पुणे शहरातील देखावे पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. मात्र, रात्री दहा पर्य़ंत देखावे सुरु असल्याने कार्यकर्त्यांचा व गणेशभक्तांचा हिरमोड होतो. याच्यासाठी शासनाने उत्सवातले चार दिवस देखावे रात्री बारा पर्य़ंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली होती. परंतु तीही पुरेशी नसल्याने यावर गणेश मंडळांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे आता 7 ते 12 सप्टेंबरपर्यंत 6 दिवस देखावे रात्री 12 वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

गणेशमंडळांना सहा दिवस रात्री बारापर्यंत देखावे खुले ठेवण्याची परवानगी दिली असली तरी गणेशमंडळांना आवाजाची मर्यादा व अन्य नियमांचे पालन मंडळांना करावे लागणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास गणेश मंडळांवर पोलीस कारवाई करतील अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

यापूर्वी फक्त चार दिवस देखावे रात्री 12 पर्यंत खुले ठेवता येत होते. मात्र, यंदाच्या वर्षी गणेश मंडळांना त्यांचे देखावे रात्री 12 पर्य़ंत खुले ठेवण्याची परवानगी दोन दिवसांनी वाढवून देण्यात आली आहे. परवानगी देताना किती मर्यादापर्यंत आवाज ठेवायचा याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर टाकण्यात आली आहे. ती पार पाडली नाही तर त्यांच्यावरही कारवाई होईल असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –