हैदराबाद स्टाईल ! गँगस्टर रावडी भारथचा ‘एन्काऊंटर’

बंगलुरु : वृत्त संस्था – खुन, खुनाचा प्रयत्न असे ५० हून अधिक गुन्हे असलेल्या गँगस्टर रावडी भारथ याचा बंगलुरु पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला. रावडी याला दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातून अटक केली होती. त्यानंतर त्याना बंगलुरु शहरात आणले होते. त्याने ज्या ठिकाणी गुन्हे केले होते. त्या ठिकाणी नेण्यासाठी पोलिसांनी पहाटे २ वाजता त्याला कोठडीतून बाहेर काढले. ही माहिती त्याच्या साथीदारांना मिळाली. त्यांनी पोलिसांच्या दोन वाहनांवर हल्ला केला. त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी राजगोपालनगरचे पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांना लागली.

सुदैवाने त्यांनी बुलेट प्रुफ जॅकेट घातले असल्याचे ते बचावले. दुसरी गोळी पोलीस गाडीला लागली. त्याच्या साथीदारांनी भारथची सुटका करुन पळून गेले. हा संदेश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आला. संपूर्ण बंगलुरु शहरात नाकाबंदी करण्यात आली होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भारथ ज्या मारुती झेनमधून पळून गेला होता. ती कार हेसराघाट्टा रोडवर असल्याची माहिती मिळाली. हे समजताच पोलिसांचे एक पथक पेनियातील हेसराघाट्टा रोडवर दाखल झाले. भारथ व त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला.

परंतु, भारथ यांनी त्यांच्या वाहनांना धडक देणाऱ्या पोलिसांवर गोळीबार केला. त्यात हवालदार सुभाष जखमी झाले. पोलीस निरीक्षक व्यंकटरामनप्पा यांनी भारथ याला शरण येण्यास सांगितले. तरीही त्याने व त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर गोळीबार सुरुच ठेवला. तेव्हा व्यंकटारामनप्पा यांनी भारथ याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्याच्या पायाला तर, दुसरी गोळी याच्या पोटात शिरली. गंभीर जखमी झालेल्या भारथ याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पंरतु, त्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता. हैदराबाद येथील नराधमांना असेच घटनास्थळावर नेल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी गोळीबार करुन त्यांना यमसदनाला पाठविले होते.

You might also like