‘त्या’ प्रकरणात कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी टोळी दोषी ; मोक्का न्यायालयाचा निकाल

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिकच्या इंदिरानगरमध्ये एका बांधकाम प्रकल्पावर जाऊन खंडणीसाठी धमकावत बिल्डरवर गोळीबार केल्याप्रकऱणी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या टोळीतील सदस्यांना विशेष मोक्का न्यायालयाने दोषी धरले आहे.

संजय सिंग, अरविंद चव्हाण, विकासकुमार सिंह, संदिप शर्मा अशी चौघांची नावे आहेत. त्यांनी २०११ साली खंडणीसाठी बिल्डरला धमकावून गोळीबार केला होता. यात एक महिला व पुरुष जखमी झाले होते. याप्रकऱणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा तपास मुंबईतील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडे देण्यात आला होता.

असे घडले होते त्यावेळी

२५ फेब्रुवारी २०११ रोडी नाशिकच्या पाथर्डीफाटा येथील पांडव लेणी परिसरातील एका बांधकाम प्रकल्पाच्या कार्यालयात दुपारी विकासकुमार व संतोषकुमार सिंग हे दोघे शिरले. तेथे कामावर असलेल्या प्रियंका पलाडकर यांनी त्यांना विचारणा केली. तेव्हा पाकिट देण्याचा बनाव दोघांनी केला. कार्यालयातील दुसऱ्या कर्मचारी देविका कोडीलकर या दोघांकडील पाकिट घेण्यासाठी गेल्या. त्यावेळी बिल्डर अशोक महेनानी देखील तेथे होते. दोघांनी पिस्तूल काढून त्यांनी गोळीबार केला. प्रियंका व मोहनानी बाजूला झाले. त्यामुळे ते बचावले. मात्र देविका जोरजोरात ओरडत होती. त्यामुळे दुसरा कर्मचारी रणजित बाहेर आला. तेव्हा त्यांच्यावर दोघांनी गोळीबार केले. देविका आणि रणजित दोघे गोळीबारात जखमी झाले.