Gangubai Kathiawadi | वेश्यांच्या हक्कांसाठी ‘डायरेक्ट’ त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरुंना भिडणारी ‘गंगूबाई काठियावाडी’ कोण आहे? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘Gangubai Kathiawadi | अल्पवयीन वय म्हणजेच वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी वेश्या वस्तीत (Prostitution) अडकली. ज्या धाडसी महिलेनं एका डाॅनच्या घरात घुसून त्याला राखी बांधली, आणि त्याच महिलेचा फोटो आता प्रत्येक वेश्या महिलेच्या घरात आहे. खरंतर वेश्यांच्या हक्कांसाठी तेव्हा देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना (Former PM Jawaharlal Nehru) थेट भिडली, ती धाडसी रणरागिनी गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) आहे तरी कोण माहिती आहे का ? तर मग चला जाणून घेऊया सविस्तर..

 

गंगा हरजीवनदास काठियावाडी (Ganga Harjivandas Kathiawadi) असं गंगुबाईचं पुर्ण नाव आहे. त्या गुजरातमधील (Gujarat) काठियावाड (Kathiawadi) या गावात राहत. तिने खूप शिकावं, असं गंगूबाईच्या आई-वडिलांना वाटत होतं. मात्र, तिचं मन पुस्तकांत नव्हे तर मुंबईच्या फिल्मीविश्वात रमलेलं होतं. गंगूबाई अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) आणि हेमामालिनीची (Hemamalini) खूप मोठी चाहती होती. तिला असंच वाटायचं की, या अभिनेत्रींसारखं आपण देखील व्हावं. ती अभिनेत्री झाली नाही, हे खरं आहे. मात्र, प्रसिद्ध मात्र नक्कीच झालीय. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी ती रमणीक (Ramanik) नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. हा रमणीक गंगूबाईच्या वडिलांकडे काम करत होता. (Gangubai Kathiawadi)

गंगूबाईचं आणि रमणीक या दोघाचं प्रेम (Love Life of Gangubai Kathiawadi) होतं. मात्र त्यांना तिच्या आई-वडिलांचा विरोध होता. म्हणून दोघांनी पळून जाऊन विवाह (Marriage) उरकला. आणि नंतर ते मुंबईत (Mumbai) गेले. काही दिवस ते दोघं एकत्र नांदले. एके दिवशी रमणीकने गंगाला म्हटलं की, “मी आपल्यासाठी घर पाहून येतो. तू माझ्या मावशीच्या घरी रहा.” रमणीकने मावशीबरोबर गंगाला एका टॅक्सीमध्ये बसवलं आणि कायमचाच निघून गेला.

 

दरम्यान, तिच टॅक्सी मावशीच्या घरी नाही तर थेट कामाठीपुरात (Kamathipura) पोहोचली. विशेष म्हणजे गंगाशी प्रेम करणा-यानेच म्हणजे रमणीकने गद्दारी करून तिला फक्त पाचशेत वेश्या व्यवसायात विकलेली होती. तो माहोल बघून गंगा घाबरली. गोंधळात पडली. आणि ओरडली. मात्र अखेर परिस्थितीशी समझौता करत तिची इच्छा असूनही काठियावाड येथे जाऊ शकली नाही. तेथेच परिस्थितीचा अंत झाला. पण…

 

मुंबईचा कुख्यात डाॅन करीमलालाचा (Don Karimlala) सहकारी सेक्सचा आनंद घेण्यासाठी आलेल्या शौकत खानने (Shaukat Khan) गंगूबाईवर अत्याचार केले.
तर, गंगूबाईने शौकतचा पत्ता शोधला आणि थेट करीमलालाच्या घरी दाखल झाली आणि तिने सर्व परिस्थिती सांगितली.
करीमलालाने तिला विश्वास दिला की, “तू निर्धास्त रहा. परत तो तुझ्याकडे आला तर मला कळवं.” गंगूबाईने करीमलाला भाऊ मानत त्याच्या हातावर राखी बांधली.

 

आगामी वेळी शौकत खान गंगूबाई जवळ आला. तिने करीमलालाला सांगितलं.
करीमलाला लगेच कामाठीपुर गाठलं आणि शौकत खानला सर्वांसमोर चोपला.
गंगूबाई ही माझी बहीण आहे. कुणी हात लावला तर याद राखा.” असं त्याने सर्वांना सांगितलं.
दरम्यान, गंगाचा भाऊ डाॅन करीमलाला आहे म्हटल्यावर तिचा कामाठीपुरात वजन वाढलं.
नंतर तिने कामाठीपुराच्या निवडणुकीत (Kamathipura Elections) उभ राहून विजयी संपादन केली.
नंतर मग वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या हक्कांसाठी गंगुबाईची लढाईला सुरूवात झाली.

ज्या मुलींना फसवून या व्यवसायात आणलं गेलं, त्या सोडवून त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचविण्यात आलं.
आपल्या कामामुळे गंगूबाई जास्तच प्रसिद्ध झाली.
तर, कामाठीपुरात वेश्या व्यवसायात महिलांचं पोटपाणी चाललं होतं.
मात्र, तोच कामाठीपुरा बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले तेव्हा गंगूबाई थेट पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांच्यापर्यंत दाखल झाली.

 

त्यानंतर तिने नेहरू यांच्यासमोर बेधडकपणे सर्व प्रश्न मांडले. अशाप्रकारे तिने कामाठीपुरा आणि तिथल्या महिलांच्या पोटापाण्यावर आलेली समस्या दूर केली.
दरम्यान तिच्या धाडसी स्वभावाने आणि तिच्या कार्यकर्तृत्वामुळे गंगूबाई काठियावाडीला प्रत्येक वेश्या महिलेच्या घरात आदराने पाहिले जाऊ लागलं.
खरंतर तीच सर्वांची आई झाली. तर आज देखील कामाठीपुऱ्यात तिचा पुतळा आहे.
त्या पुतळ्याला महिला आदराने मनोभावे पुजतात.
तर अशी आहे हकिकत की जिने आपल्या धाडसी स्वभावाने वेश्यांच्या हक्कांसाठी न्याय मिळवून दिला.
गंगूबाई आणि तिचं कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संजय लिला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ नावाचा सिनेमा लवकरच तुमच्या पर्यंत पोहचतोय.

 

Web Title :- Gangubai Kathiawadi | Who is the Gangubai Kathiawadi who fought for the rights of prostitutes against the then Prime Minister Pandit Nehru Find out

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा