Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता, हे गुंडाराज…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना काल पुण्यात (Pune News) शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आले. पुणे महापालिका (Pune Corporation) परिसरात त्यांना धक्काबुक्की झाल्यानंतर पालिकेच्या पायरीवरुन सोमय्या खाली पडले. यानंतर त्यांना दुखापत झाली आहे. पुण्यातील संचेती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सोमय्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रूग्णालयात गेले. त्यावेळी पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू असल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

 

किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता. सोमय्या यांना मारण्याची पूर्ण तयारी झाली होती. हे गुंडाराज असून आज सोमय्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती. हल्ला झाले त्यावेळी पोलीस काय करत होते ? किरीट सोमय्यांवर हल्ला करून काहीही होणार नाही. ही घटना लक्षात घेता पुणे पोलिसांनी (Pune Police) ‘सुमोटो’ गुन्हा दाखल करावा. कारण ही दंगल आहे. निषेध शब्द बोथट असून आम्ही स्वस्थ बसणार नाही.” असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे.

 

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, ”किरीट सोमय्या यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्यासोबत भविष्यातील गोष्टींवर चर्चा झाली. ते देखील या हल्ल्यांना घाबरत नाहीत आणि मी पण घाबरत नाही. असे शंभरजण खिशात घेऊन फिरतो,” असं म्हणत पाटील यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) हल्लाबोल केला आहे. या दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे आमदार नितेश राणेंबाबतीत (MLA Nitesh Rane) देखील सुडबुद्धीने वागत असल्याचा आरोप केला आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil | chandrakant patil allege attempt to murder of kirit somaiya in pune by shivsena

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा