‘या’ माजी आमदारास मिळणार सर्वाधिक ‘पेन्शन’ !

सांगोला/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र विधिमंडळातील जेष्ठ सदस्य आणि तब्बल 55 वर्षे सांगोला मतदारसंघाचे आमदार गणपतराव देशमुख यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसले नाहीत. प्रकृती अस्वस्थाच्या कारणास्तव त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.

Ganpatrao-Deshmukh

गणपतराव देशमुख यांना पहिल्या पाच वर्षासाठी 50 हजार रुपये तर पुढील प्रत्येक वर्षासाठी प्रत्येकी दोन हजारांप्रमाणे 92 हजार अशी एकूण 1 लाख 42 हजार रुपयांची दरमहा पेन्शन मिळणार आहे. सर्वाधिक पेन्शन घेणारे ते महाराष्ट्रातील पहिले आमदार आहेत. परंतु अद्याप त्यांना पेन्शन मिळालेली नाही.

राज्यातील माजी आमदारांना राज्याच्या तिजोरीतून पेन्शन दिली जाते. पहिल्या पाच वर्षासाठी दहमहा 50 हजार तर त्यानंतरच्या आमदारकीच्या प्रत्येक एका वर्षासाठी दोन हजाराप्रमाणे वाढ केली जाते. राज्यातील 789 माजी आमदारांच्या पेन्शनसाठी सरकार दरवर्षी 65 कोटी 27 लाख 60 हजार रुपये देते. राज्य सरकारच्या योजनेनुसार पाच वर्षे आमदार राहिलेल्या माजी आमदाराला दरमहा 50 हजार रुपये पेन्शन दिली जाते. त्यानंतर 10 वर्षे आमदार राहिलेल्यांना 60 हजार तर 15 वर्षे आमदार राहिलेल्यांना 70 हजार पेन्शन मिळते.

राज्यात माजी आमदारांमध्ये 50 ते 60 हजारापर्यंत पेन्शन घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार ठरलेल्यांना अद्याप पेन्शनचा लाभ मिळाला नसून त्यांच्यासाठी आगामी बजेटमध्ये वढीव तरतूद करण्याचे नियोजन असल्याचे वित्त विभागातील सूत्रांनी सांगितले. राज्याच्या डोक्यावर कर्जाचा अन त्यातून भरावे लागणारे व्याज, शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च आणि सरकाला दरवर्षी मिळणाऱ्या उत्पन्नाची अपडेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागवली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/