गॅस्ट्रो एन्टरायटिस टाळण्यासाठी अशी घ्यावी काळजी

पोलीसनामा ऑनलाइन – दूषित पाणी किंवा अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे गॅस्ट्रो एन्टरायटिस हा आजार होतो. या आजाराने ग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळेही हा आजार होऊ शकतो. उन्हाळ्यात हा आजारा मोठ्या प्रमाणात बळावतो. अनेक लोक यामुळे त्रस्त असतात. या आजाराला कारणीभूत ठरणारे बॅक्टेरियांसाठी उन्हाळ्याचे वातावरण अनुकूल असते. गॅस्ट्रो एन्टरायटिस आजाराची लागण झाल्याचे लक्षात आल्यास व पाच दिवसांत आराम न मिळाल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.

गॅस्ट्रो एन्टरायटिसमुळे पोटात सतत जळजळ होते. पचनक्रियेवर बॅक्टरियाचा इफेक्ट झाल्यामुळे हा आजार होतो. गॅस्ट्रो एन्टरायटिस आजारामध्ये पोटाच्या अनेक समस्या उद्भवतात. पोटामध्ये सतत होणारी जळजळ ही बॅक्टेरिया, व्हायरस आणि प्रोटोजोआ यामुळे होते. पचनक्रियेमध्ये काही विषारी तत्व असल्याने आतड्यांमध्ये जळजळ होते आणि सूज येते.

हा आजारा टाळण्यासाठी साफ-सफाई असणाऱ्या ठिकाणींच जेवण करावे, स्वच्छ पाणी प्या. तसेच, पाणी उकळून पिण्याचा प्रयत्न करा, स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा. त्याचबरोबर भाज्या तयार करताना स्वच्छ करून त्यानंतरच शिजवा, शिळे पदार्थ खाणं शक्यतो टाळा. फार त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जावे. जे पदार्थ पचण्यास जड असतात अशा पदार्थांच्या अतिसेवनाने या आजाराचा सामना करावा लागतो. अ‍ॅलर्जी असणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यानेही हा आजार होऊ शकतो. दूषित खाद्य पदार्थ खाल्यानेही हा आजार होऊ शकतो. डायरिया हे गॅस्ट्रो एन्टरायटिस या आजाराचे मुख्य लक्षणांपैकी एक आहे. जेव्हा बॅक्टेरिया किंवा वायरस आतड्यांवर आक्रमण करतात. यामध्ये फ्लुइड तयार होणं अत्यंत अवघड असतं. त्यामुळे या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्ती फार लवकर डिहायड्रेट होतात.

डायरियाने ग्रस्त असणाऱ्या रूग्णांना उलट्याही होत असतील तर डिहायड्रेशन आणखी धोकादायक ठरतं. सुरुवातीमध्ये रूग्णांना फक्त २ ते ३ वेळा फक्त उलट्या होतात. परंतु यामुळे जास्त प्रमाणात उलट्या होत असतील तर लगेच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं असतं. डोकेदुखी आणि ताप येणं, गॅस्ट्रो एन्टरायटिसमुळे पीडित असणाऱ्या लोकांना सांधेदुखी, थकवा येणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.