Gautam Adani Will Be New Cement King | गौतम अदानी होणार आता देशाचे ‘सिमेंट किंग’ ! ACC-Ambuja Cement इतक्या कोटीत करणार टेकओव्हर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Gautam Adani Will Be New Cement King | उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आता देशाचे नवे ’सिमेंट किंग’ होणार आहेत. त्यांच्या अदानी समूहाने (Adani Group) देशातील दोन मोठ्या सिमेंट कंपन्या एसीसी लिमिटेड (ACC Limited) आणि अंबुजा सिमेंट्स (Ambuja Cements) खरेदी केल्या आहेत. (Gautam Adani Will Be New Cement King)

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी कुटुंबाने (Adani Family) विशेष ऑफशोर कंपनी (SPV) स्थापन करून एसीसी आणि अंबुजा सिमेंटमधील स्विस सिमेंट कंपनी Holcim Ltd ची हिस्सेदारी खरेदी केली आहे. यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये करार (Definitive Agreement) झाला असून यासोबतच अदानी समूह आता सिमेंट व्यवसायातही उतरणार आहे. (Gautam Adani Will Be New Cement King)

इतकी आहे Holcim ची हिस्सेदारी

Holcim आणि त्यांच्या उपकंपन्यांचा अंबुजा सिमेंटमध्ये 63.19% आणि एसीसीमध्ये 54.53% हिस्सा आहे. एसीसी सिमेंटमधील आपल्या 54.53% हिस्सेदारीपैकी, 50.05% हिस्सेदारी अंबुजा सिमेंटच्या माध्यमातून विकत घेतली होती.

10.5 अरब डॉलरची डील

अदानी समूहाने (Adani Group) दोन्ही कंपन्यांमधील होल्सीमच्या हिस्सेदारी 10.5 अरब डॉलर (सुमारे 81,360 कोटी रुपये) चा करार केला आहे. पायाभूत सुविधा आणि साहित्य क्षेत्रातील हा देशाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे.

अदानी बनले सिमेंट किंग

हॉल्सिम ग्रुपच्या (Holcim Group) कंपन्या गेल्या 17 वर्षांपासून भारतात व्यवसाय करत आहेत. कंपनीचे भारतात तीन मोठे ब्रँड आहेत, ज्यात अंबुजा सिमेंट, एसीसी लिमिटेड आणि मायसेम (Mycem) यांचा समावेश आहे. हॉल्सिम ही सध्या अल्ट्राटेक सिमेंट (Ultratech Cement) नंतर भारतीय बाजारपेठेतील दुसरी सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे. अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेड यांची एकत्रित क्षमता वार्षिक 66 दशलक्ष टन आहे.

अदानी समूहाने या दोन सिमेंट कंपन्या विकत घेतल्यानंतर ती भारतासारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत एका झटक्यात नंबर-2 सिमेंट कंपनी बनली आहे.
अंबुजा सिमेंटचे देशात 6 सिमेंट प्लांट आहेत. तर 8 सिमेंट ग्राइंडिंग युनिट आहेत. एकट्या अंबुजा सिमेंटची वार्षिक उत्पादन क्षमता 31 दशलक्ष टन आहे.

Web Title : Parbhani News | hundred people food poisoned in parbhani district due to consumption of marriage meal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

 

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

 

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

 

Visceral Body Fat | व्हिसरल फॅट सर्वात धोकादायक ! जाणून घ्या कोणती चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते

 

Pune News | पुण्यातील आजी आता 75 वर्षानंतर जाणार पाकिस्तानातील आपल्या घरी…हृदयाच्या कोपर्‍यात नेहमी होते रावळपिंडी