जसलीन मथारूला गौतम गुलाटीनं दिला ‘ओव्हर अ‍ॅक्टिंग’च्या दुकानाचा ‘टॅग’, अभिनेत्री झाली ‘हैराण’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – मुझसे शादी करोगे हा रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस विनर गौतम गुलाटी होस्ट करत आहे. शुक्रवारी तो शोमध्ये येऊन स्पर्धकांचा क्लास घेताना दिसतो आणि शोमध्ये एक नवीन वळण येताना दिसतं. अपकमिंग एपिसोडमध्ये एक गेम खेळली जाताना दिसणार आहे. गौतम त्यांना सांगणार आहे की, पब्लिकनं त्यांना काय टॅग दिले आहेत.

जसलीन मथारून ओव्हरअ‍ॅक्टींगचं दुकान ?
सर्वात आधी विषय झाला तो म्हणजे ओव्हरअ‍ॅक्टींगचं दुकान या टॅगचा. गौतमनं सांगितलं की, पब्लिकनं घरातील एका ओव्हरअ‍ॅक्टींगचं दुकान असा टॅग दिला आहे. तुम्हाला काय वाटतं तो कोण आहे. यानंतर सर्वजण संजना गलरानीचं नाव घेऊ लागले. परंतु संजना स्वत:ला नाही तर घरातील जसलीन मथारू हिला ओव्हर अ‍ॅक्टींगचं दुकान मानते. याचदरम्यान जसलीन आणि संजना यांच्यात थोडा वादही होतो.

नंतर गौतम गुलाटी सर्वांना चकित करत खुलासा करतो की, इंडियाच्या नजरेतून ओव्हरअ‍ॅक्टींगचं दुकान संजना गलरानी नाही, तर जसलीन मथारू आहे. आपलं नाव ऐकून तर जसलीनला धक्काच बसतो. ती म्हणते, “मी एक्सप्रेसिव्ह आहे याचा अर्थ असा नाही की मी ओव्हरअ‍ॅक्टींग करते.”

जसलीनला विश्वासच बसत नाही की, तिला हा टॅग मिळाला आहे. परंतु गौतम गुलाटी तिला तिचे व्हिडीओ दाखवत म्हणतो, “हे पाहिल्यानंतर तुला समजेल की, इंडियानं तुला हा टॅग का दिला आहे.”