खुशखबर…! मोदी सरकारने PF वरचे व्याजदर जाहीर केले, तुमचा होणार फायदा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन येत्या 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्र सरकारने जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी जनरल प्रॉव्हिडंट फंडवर (GPF) मिळणारे व्याजदर जाहीर केले आहेत. अर्थमंत्रालयाने याबद्दल एक नोटिफिकेशन जारी केले असून जानेवारी ते मार्च 2020 पर्यंत जीपीएफ अर्थात जनरल प्रॉव्हिडंट फंडवर 7.9 टके दराने व्याज मिळणार आहे. एक वर्ष पूर्ण करणारे अस्थायी कर्मचारी, रि एम्प्लॉइड पेनशनर्स आणि सगळे कायमस्वरुपी कर्मचारी जनरल प्रॉव्हिडंट फंड नियम 1960 च्या कशेत येतात.

छोट्या बचत योजनेचे व्याजदर बदलले
यापूर्वी पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांचे व्याजदर जानेवारी ते मार्च या काळात स्थिर ठेवले होते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट अशा पोस्टाच्या छोट्या बचत योजनांसाठी जानेवारी ते मार्च 2020 या काळात व्याजदर 7.9 राहिले. केंद्र सरकारने या आर्थिक वर्षाच्या तिमाहितसाठी या योजनेवरच्या व्याजदरात काहीही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनांवरच्या व्याजदारत बदल करण्यात आला आहे
1. काँट्रिब्युटरी प्रॉव्हिडंट फंड
2. जनरल प्रॉव्हिडंट फंड सेंट्रल सर्व्हिसेस
3. स्टे रेल्वे प्रॉव्हिडंट फंड
4. ऑल इंडिया सर्व्हिस प्रॉव्हिडंट फंड
5. इंडियन ऑर्डिनन्स डिपार्टमेंट प्रॉव्हिडंट फंड
6. जनरल प्रॉव्हिडंट फंड डिफेन्स सर्व्हिसेस
7. इंडियन नेवल डॉकयार्ड वर्कमेन्स प्रॉव्हिडंट फंड
8. इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीज वर्कमेन्स प्रॉव्हिडंट फंड
9. आर्म्ड फोर्सेस पर्सनल प्रॉव्हिडंट फंड
10. डिफेन्स सर्व्हिसेस ऑफिसर्स प्रॉव्हिडंट फंड

You might also like