धक्कादायक ! मनुष्यानंतर आता कुत्र्याला देखील झाला ‘कोरोना’, ‘या’ देशात आरोग्य विभागानं दिले ठार मारण्याचे आदेश

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने जगभरातील १ कोटी पेक्षा अधिक लोकांना या संसर्गाची बाधा झाली आहे. तसेच माणसांप्रमाणे प्राण्यांना सुद्धा याची बाधा होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता अमेरिकेतील जॉर्जिया परिसरात कोरोना संसर्गित एक कुत्रा आढळला आहे. या संसर्गाची लागण झालेला जगातील हा दुसरा कुत्रा असावा असं सांगितलं जातंय.

या संदर्भात जॉर्जियाच्या आरोग्य विभागाने बुधवारी एका पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यात म्हटलं आहे की, सहा वर्षीय मिश्र जातीच्या कुत्र्याला कोरोना संसर्गाची लागण झाल्याचं आढळलं आहे. त्यापूर्वी त्या कुत्र्याच्या मालकास या संसर्गाची बाधा झाली होती, त्यानंतर कुत्र्याची चाचणी करण्यात आली. यामध्ये धक्कादायक गोष्ट अशी की, कुत्र्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर त्याला ठार करण्यात आलं.

आरोग्य अधिकाऱ्याने सांगितलं की, कुत्र्यास न्यूरॉलॉजिकल नावाचा रोग झाला होता हा रोग आणि कोव्हिड-१९ चा संबंध नाही. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आतापर्यंत उपलब्ध असलेल्या मर्यादित माहितीच्या आधारे पाळीव प्राण्यांपासून कोरोना संसर्गाचा प्रसार होण्याचा धोका खूपच कमी आहे.

जगात कोरोना संसर्गाचा हाहाकार

जगभरात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या १ करोड १९ लाख ९ हजार ६७९ इतकी झाली आहे. त्यातील ६२ लाख ९७ हजार ६१० जणांचा उपचारानंतर सोडून देण्यात आलं आहे. तर ५ लाख २९ हजार ११३ जणांचा मृत्यू या संसर्गामुळे झाला आहे. ब्राझीलमध्ये गेल्या २४ तासांमध्ये सर्वाधिक ४२ हजार २२३ रुग्णांची नोंद झाली आहे.

भारतात वाढली कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या

गेल्या २४ तासांत देशात २२ हजार ७७१ नवीन कोरोना संसर्गित रुग्णांची नोंद झाली. एक दिवसातील रुग्ण वाढीबाबत आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे. देशात सध्या एकूण रुग्णांची संख्या ६ लाख ४८ हजार ३१५ झाली आहे. तर २४ तासांत ४४२ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या १८ हजार ६५५ झाली आहे. तर २ लाख ३५ हजार सक्रिय रुग्ण असून, ३ लाख ९४ हजार २२७ रुग्णांवरती यशस्वी उपचार करुन त्यांना सोडून देण्यात आलं आहे.