‘या’ पध्दतीने नवरात्रीला करा ‘घट स्थापना’, जाणून घ्या ‘शुभ मुहूर्त’ आणि ‘नियम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लवकरच नवरात्रीला सुरवात होणार आहे. नवरात्रीमध्ये अनेक जण उपवास धरतात तर अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात दुर्गा मातेची पूजा केली जाते. 9 दिवसाच्या सणामध्ये प्रत्येक दिवशी दुर्गामातेच्या एका एका रूपाची पूजा होते. या उत्सवात पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते.

घट स्थापनेचा शुभ मुहूर्त
29 सप्टेंबरला सुरु होणाऱ्या नवरात्रीच्या दिवशीच घटस्थापना केली जाईल. या वेळच्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 6 वाजून 16 मिनिटांपासून ते सकाळी 7 वाजून 40 मिनिटांपर्यंतचा आहे. त्याचप्रमाणे दुपारी सुद्धा एक महत्वाचा मुहूर्त आहे 11 वाजून 48 मिनिटांपासून ते 12 वाजून 35 मिनिटांपर्यंत आहे.

अशा प्रकारे करू शकता घटस्थापना
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते मनोभावे देवीची पूजा अर्चना करून प्रत्येक जण या उत्सवाला सुरुवात करतो.

घटस्थापना करताना नदीमधील वाळूचा उपयोग करून त्यात बीज टाका त्यानंतर गंगाजल, लवंग, इलायची, पान, सुपारी, चंदन, हळद, सुट्टा रुपया, त्यानंतर पुष्प अर्पण करून गायत्री म्हणत सात धान्य रेतीवर टाका. घटस्थापनेच्या ठिकाणी 9 दिवस सतत दिवा पेटत ठेवा,

घटस्थापने बाबतचे हे विशेष नियम लक्षात असुद्या
– शुभ मुहूर्तावरच घटस्थापना करा.
– घटस्थापनेवेळी एका पाटावर लाला आणि पांढरा कपडा टाकून त्यावर घटस्थापना करा.
– कलशमध्ये तांदूळ टाकून त्याच्या मधोमध एक नारळ सुद्धा ठेवा.
– घटस्थापना करताना सतत मंत्र उच्चार करत रहा, चालिसा किंवा सप्तशती तसेच गायत्री मंत्र सुद्धा       यावेळी तुम्ही म्हणू शकता.
– पूजा झाल्यानंतर उत्तम नेवैद्य दाखवावा
– पूजेच्या वेळी लाल फुलांचा वापर करावा.
– नवरात्रीच्या दरम्यान आला आहार एकदम सात्विक ठेवा.

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like