Ghorpade Peth Pune Crime | पुणे : माफी मागण्यास सांगून युवकावर ब्लेडने वार, खडक पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ghorpade Peth Pune Crime | विनाकारण शिवीगाळ करुन ‘मागे जे झाले त्याबाबत माफी माग’ असे म्हणून एका युवकाच्या मानेवर ब्लेडने वार (Blade Attack) करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (दि.16) रात्री नऊच्या सुमारास घोरपडे पेठेत घडली आहे.

याबाबत जखमी इमरान युनुस काशी (वय-36 रा. चांदतारा सोसायटी जवळ, घोरपडी पेठ, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सिद्दीकी समीर शेख, वासीक अनीस शेख (रा. घोरपडी पेठ, पुणे) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास आरोपी इमरानच्या घरासमोर आले. आरोपींनी त्याला विनाकारण शिवीगाळ केली. तसेच मागे जे झाले त्या बाबत तु माफी माग असे म्हणून अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी वासीक याने ब्लेडने इमरान याच्या मानेवर वार करुन जखमी केले. तसेच काठीने हातावर व पोटावर मारहाण केली. पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.

बदनामी करण्याची धमकी देऊन महिलेला मारहाण

पुणे : हॉटेल व्यवसायात गुंतवणूक केलेले पैसे परत मागून एका महिलेला बदनामी (Defamation) करण्याची धमकी देऊन मारहाण केली. हा प्रकार विमाननगर परिसरातील मैत्री आयटी पार्क (Maitri Park Lohegon) जवळ असलेल्या फुटपाथवर मंगळवारी (दि.16) घडला आहे. याप्रकरणी गणेश सिंग (वय-25) याच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्रिती रमेश आहुजा (वय-34 रा. चंदननगर) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांनी भागिदारीत हॉटेल सुरु केले.
आरोपीने हॉटेल व्यवसायात पैसे असल्याचे सांगून फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली.
त्यावेळी महिलेने पैसे नसल्याचे सांगितले.
याचा राग आल्याने आरोपीने महिलेसोबत वाद घालून शिवीगाळ केली.
तसेच बदनामी करण्याची धमकी देऊन मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांची दोन बोटे फ्रॅक्चर झाली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha | अमोल कोल्हे यांनी शिरूरसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, जोरदार शक्तीप्रदर्शन (Video)

Baramati Lok Sahba | सुप्रिया सुळे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला (Videos)

Ajit Pawar NCP MLA | अजित पवारांच्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य, सहा महिन्यानंतर महायुती तुटणार? बारणेंच्या अडचणी देखील वाढू शकतात