Girish Mahajan |  ‘2024 च्या निवडणुकी आधी राज्यात मोठ्या घडामोडी’, मंत्री गिरीश महाजन यांचे सूचक वक्तव्य

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे (Congress) अनेक नेते आमच्या संपर्कात आहे. सर्वांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. परंतु कुणाला घ्याव, कुणाला काय द्यावं, असा प्रश्न आमच्यासमोर आहे, असं सूचक वक्तव्य भाजप (BJP) नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमचे नेते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आहेत. आता अजित पवार (Ajit Pawar) हे देखील उपमुख्यमंत्री आहेत. हे त्यासंदर्भात निर्णय घेतील असेही गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले.

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे संपर्कात असल्याची चर्चा आहे? यावर बोलताना गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. पण आम्हाला पुन्हा तीन उपमुख्यमंत्री तसेच दोन मुख्यमंत्री करता येत नाहीत. पण कोणाला कधी घेणार, काय म्हणून घेणार हे सांगू शकत नाही. मात्र 2024 च्या निवडणुकांच्या (Elections 2024)  आधी राज्यात मोठ्या घडामोडी झालेल्या तुम्हाला दिसतील, असं सूचक विधान महाजन यांनी केलं.

 

मंत्रिमंडळ विस्तारामुळे खाती बदलतील

 

गिरीश महाजन म्हणाले, आता मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाल्याने अनेकांची खाते बदलतील. अनेकांचे कमी होतील. आधीच माझ्याकडेही दोन ते तीन जिल्ह्यांचा पालकमंत्रीपदाचा पदभार आहे. तसेच तीन वेगवेगळी खाते आहेत. आता 40 मंत्री होतील. त्यामुळे खाते वाटली जातील, असंही महाजन म्हणाले. केंद्रातील मोदी सरकारला (Modi Government) नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जामनेर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

 

विदर्भ दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंना टोला

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री असताना विदर्भाला काय दिलं,
किती निधी दिला? सिंचनासाठी कोणतीही योजना दिली नाही. कोणत्या योजनेसाठी निधीही दिला नाही.
एखादं तरी काम त्यांनी केलं, असं सांगावं. आणि आता सत्ता नसताना ते विदर्भाचा विकास करायला जात आहे,
हे अतिशय हास्यास्पद आहे, असा टोला गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. मुख्यमंत्री असताना ते कधी घराबाहेर पडे नाहीत. विदर्भात त्यांचा एकही दौरा झाला नाही. आणि ते म्हणतायेत विदर्भाच्या दौऱ्यावर निघालोय. पण आता विदर्भाच्या जनतेला हे मान्य नाही, अशी टीका त्यांनी केली.

 

Web Title : Girish Mahajan ‘Major developments in the state before 2024 elections’, Minister Girish Mahajan’s indicative statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा