Girish Mahajan On Eknath Khadse | गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर पुन्हा बोचरी टीका, ”आता बघा तुमची अवस्था काय होतेय, तुमचे भविष्य…”

जळगाव : Girish Mahajan On Eknath Khadse | पक्षातील विरोधक त्रास देत असल्याच्या कारणावरून चाळीस वर्षे भाजपात घालवलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेले होते. आता ते पुन्हा भाजपामध्ये (BJP) जाणार आहेत, त्यांनीच ही घोषणा काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केली. मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांना वेटींगवर ठेवल्याने खडसेंची पुन्हा कोंडी झाली आहे. पक्षातील कट्टर विरोधक आणि देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू, भाजपा नेते गिरीश महाजन हे खडसेंना संधी मिळेल तेव्हा अपमानित करत आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा खडसेंवर नाव न घेता जिव्हारी लागेल अशी टीका केली आहे. (Lok Sabha Election 2024)

जळगावातल्या एका सभेत भाजपा नेते गिरीश महाजन यांनी म्हटले की, नुसते मी-मी करून चालत नाही. इथे पक्षाशिवाय दुसरा कोणीही मोठा नाही. मला वाटते ज्याचे पुण्य संपले तो आमच्या पक्षातून बाहेर गेला. तुम्ही आता बाहेर गले आहात, आता बघा तुमची अवस्था काय होतेय. तुमचे भविष्य कसे आहे ते पाहा. या पक्षात मी मी म्हणणारे काही जण होते, पण आता त्यांची अवस्था काय झालीय ते पाहा.(Girish Mahajan On Eknath Khadse)

खडसेंवर नाव घेता टीका करताना गिरीश महाजन पुढे म्हणाले, ज्यांनी तीस-पस्तीस वर्षे आमदारकी उपभोगली, तब्बल २० वर्षे लाल दिव्याच्या कारमधून फिरले, माझ्यामुळेच पक्ष आहे, मी आहे म्हणून भाजपा आहे, मी आहे म्हणून बँक आहे, दूध डेअरी आहे, माझ्यामुळेच सर्वकाही आहे, अशा अविर्भावात असणारे नेते आता कुठे पडलेत ते सर्वांना माहिती आहे, अशी बोचरी टीका महाजन यांनी केली.

ते पुढे म्हणाले, पस्तीस वर्षे पक्षामुळे त्यांनी अनेक गोष्टी उपभोगल्या, मात्र एकदा पक्षाच्या तिकीटावर निवडणूक हरले.
एकदा पडल्यामुळे लगेच दुसऱ्या वर्षी त्यांनी पक्ष बदलला. त्यामुळे पस्तीस वर्ष वाया गेली.
याचा अर्थ तुमची पक्षाविषयी काहीच निष्ठा नाही. माझ्यावर अन्याय झालाय, असे म्हणण्याला काहीच अर्थ नाही.

गिरीश महाजन म्हणाले, मुळात पक्ष आहे म्हणून आपल्याला किंमत आहे, पक्ष आहे म्हणून आपण आहोत.
उद्या गिरीश महाजनला असे काही वाटले तर हे सगळे शून्य होईल.
तुम्ही मतदारसंघात कितीही कामे करा, लोकांना काहीही सांगा, तरी पक्ष महत्त्वाचा आहे. निष्ठेला खूप महत्त्व आहे.
अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना आपण आजवर तिकीट दिले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली

Pune Estate Broker Arrested On Mumbai Airport | मुंबई विमानतळावर BMW कारमध्ये सापडले US बनावटीचे पिस्तूल अन् काडतुसे, पुण्यातील रिअल इस्टेट ब्रोकर तुषार काळे, सचिन पोटे, आकाश शिंदेला अटक

Shewalwadi Pune Firing Case | पुणे हादरलं, सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार; ‘सिक्युरिटी एजन्सी’च्या वादातून गोळीबार