‘मी वडिलांची हत्या केलीय, अटक करण्यासाठी या !’ मुलीच्या फोननं पोलिसही हैराण

भोपाळ : वृत्तसंस्था –   दारु पिऊन सतत आईला (mother) मारहाण करत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या वडिलांची (father) एका 16 वर्षाच्या मुलीने हत्या (kills) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भोपाळमध्ये (bhopal) घडली असून मुलीने कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धोपटण्याने वडिलांची हत्या केली. यानंतर तीने 100 नंबरवर पोलिसांना (police) फोन करुन आपण केलेल्या कृत्याची कबुली देत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती बेरोजगार होता. आपल्या मोठ्या मुलाच्या कमाईवरच त्यांचा खर्च भागत होता. सतत दारु पित असल्याने आणि हिंसाचार करत असल्याने कुटुंब वैतागले होते. बुधवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास घरामध्ये मुलाच्या लग्नाची चर्चा सुरु होती. लग्नाची चर्चा सुरु असताना वडिलांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र ते ऐकत नव्हते.

यामुळे चिडलेल्या 16 वर्षाच्या मुलीने धोपटणं उचललं आणि वडिलांच्या डोक्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मुलीने 100 नंबरवर पोलिसांना फोन केला आणि आपण वडिलांची हत्या केली असून अटक होण्यासाठी वाट पाहत आहे, असे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला ताब्यात घेतले. मुली विरोधात गुन्हा दाखल करुन तिला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

You might also like