Goa Election Results | ‘मी भाजपाचा अनधिकृत उमेदवार म्हणून लढलो’, उत्पल पर्रीकर यांना पराभूत केल्यानंतर बाबूश मोन्सेरात यांचं खळबळजनक वक्तव्य

पणजी : वृत्तसंस्था – गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये (Goa Election Results) जेवढी शिवसेनेच्या (Shivsena) एंट्रीची झाली, त्याहून अधक चर्चा उत्पल पर्रीकरांचे (Utpal Parrikar) कापलेलं तिकीट, त्यांचा राजीनामा (Resignation) आणि बाबूश मोन्सेरात (Babush Monserrat) यांना मिळालेली भाजपची (BJP) उमेदवारी याची झाली. उत्पल पर्रीकर यांनी पणजीमधून (Panaji) तिकीट मागितले होते. मात्र, भाजपने त्यांना तिकीट नाकारून बाबूश मॉन्सेरात यांना तिकीट दिले. या अटीतटीच्या लढतीत भाजपचे बाबूश मोन्सेरात यांनी उत्पल पर्रीकर यांचा 800 हून अधिक मतांनी (Goa Election Results) पराभव केला. यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु असताना बाबूश मोन्सेरात यांनी भाजप आणि स्थानिक नेतृत्वावर तोंडसुख घेतलं.

 

उत्पल पर्रीकर यांनी भाजपकडे त्यांच्याच्या वडिलांचा अर्थात मनोहर पर्रीकरांच्या (Manohar Parrikar) पारंपारिक पणजी मतदारसंघातून उमेदवारी मागितली. मात्र, भाजपने त्यांना इतर मतदारसंघाची निवड करण्यास सांगितले. त्यानंतर उत्पल यांनी भाजपचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढवली. तर भाजपने बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली. त्यांनी उत्पल यांचा 800 मतांनी पराभव करत विजय मिळवला होता. ही निवडणूक पर्रीकर आणि   मोन्सेरात यांच्यात अटीतटीची झाली.

 

बाबूश मोन्सेरात यांचा खळबळजनक वक्तव्य
विजयी झाल्यानंतर बाबूश मोन्सेरात यांनी आपण भाजप आणि काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांच्या जोरावरच जिंकल्याचे सांगितले. मी भाजपचा अनधिकृत उमेदवार (Unauthorized Candidate) म्हणून लढलो. दोन्ही बाजूच्या काही कार्यकर्त्यांच्या जोरावरच आम्ही निवडणूक जिंकू शकल्याचे त्यांनी सांगितले.

 

भाजप केडरनं मला स्वीकारलं नाही
यावेळी बोलताना बाबूश मोन्सेरात यांनी भाजपवर तोंडसुख घेतलं. ते म्हणाले, मला वाटतं की भाजपा केडरनं (BJP Cadre) मला पक्षात स्वीकारलेलंच नाही. मी याकडे त्या दृष्टीने पाहतो. जर उत्पल पर्रीकरांना इतकी मतं मिळत असतील, तर ती फक्त भाजपा केडरनं आपली मतं त्यांच्याकडे वळवल्यामुळेच मिळाली. मी फक्त हेच बघू शकतो. भाजपा पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला डॅमेज कंट्रोल (Damage Control) करण्यात अपयश आलं, असंही बाबूश मोन्सेरात म्हणाले.

बाबूश मोन्सेरात यांचा दावा
बाबूश मोन्सेरात यांनी भाजपच्या महिला नेत्या काँग्रेसच्या टेबलवर बसल्याचा दावा केला आहे. भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा निवडणुकीच्या दिवशी काँग्रेसच्या टेबलवर बसल्या होत्या, असेही ते म्हणाले.

 

Web Title :- Goa Election Results | babush monserat in goa election wins against utpal parrikar targets bjp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP MLA Pankaj Singh | अजित पवारांचे रेकॉर्ड भाजपच्या या आमदारानं मोडलं, जाणून घ्या

 

TCS Share Buyback | खुली झाली 18000 कोटीची ऑफर, भाग घ्यावा का; अगोदर जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी

 

RBI FD Rules Changed | आरबीआयने एफडीचे बदलले नियम ! जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान