TCS Share Buyback | खुली झाली 18000 कोटीची ऑफर, भाग घ्यावा का; अगोदर जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – TCS Share Buyback | IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी Tata Consultancy Services (TCS) ची शेअर बायबॅक ऑफर 9 मार्च रोजी सुरू झाली आहे आणि ती 23 मार्च रोजी बंद होईल. कंपनी बोर्डने 12 जानेवारी रोजी बायबॅकची घोषणा केली होती. कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर प्रति शेअर 4,500 या किमतीने 18,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या रकमेसाठी 4,00,00,000 स्टॉक पुन्हा खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. (TCS Share Buyback)

 

या अंतर्गत रेकॉर्ड डेट 23 फेब्रुवारी होती. टीसीएसचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा शेअर बायबॅक असेल. जर तुम्ही शेअरहोल्डर असाल आणि बायबॅकमध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.

 

कोण सहभागी होऊ शकतात बायबॅकमध्ये
23 फेब्रुवारीपर्यंत कंपनीचे शेअर्स असणारे सर्व गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स एका डिफाईंड रेशोमध्ये ऑफर करू शकतात. बायबॅकसाठी 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी किमतीचे शेअर धारण करणार्‍या शेअरधारकांचा रिटेल श्रेणी अंतर्गत विचार केला जाईल. तर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त शेअर्स असणार्‍यांचा सर्वसाधारण वर्गात विचार केला जाईल. (TCS Share Buyback)

 

Swastika Investmart Ltd. चे रिसर्च हेड संतोष मीना यांचे मत आहे की, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी टीसीएस बायबॅक ही चांगली संधी आहे. हिस्टोरिकल अ‍ॅक्सप्टन्स रेशो सुमारे 70 टक्के आहे आणि स्टॉक प्राईसेस बायबॅक प्राईस ओलांडते. जर फंडामेंटलवर नजर टाकली तर आऊटलूक बुलिश आहे.

 

किरकोळ गुंतवणूकदारांनी बायबॅकमध्ये भाग घेतला पाहिजे. जिथे आम्ही 50-70 टक्क्यांच्या दरम्यान अ‍ॅक्सप्टन्स रेशोची अपेक्षा करत आहोत, तर उर्वरित शेअर दीर्घ कालावधीसाठी होल्ड ठेवावेत.

किती शेअर्स ऑफर करूशकता?
तुम्ही कोणत्या श्रेणीत येता यावर ते अवलंबून आहे. जर तुम्ही आरक्षित श्रेणीत असाल तर कंपनी तुमच्या एकूण शेअर्सपैकी 14.61 टक्के शेअर्स खरेदी करेल. याचा अर्थ टीसीएस तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक 7 शेअरमागे 1 शेअर खरेदी करेल. जनरल कॅटेगरीत प्रत्येक 108 इक्विटी शेअर्ससाठी बायबॅकचे प्रमाण 1 असेल.

 

सहभागी होणे आवश्यक आहे का
गुंतवणूकदारांनी शेअर बायबॅकमध्ये भाग घेणे आवश्यक नाही. काहीवेळा स्टॉकचा दृष्टीकोन मजबूत असतो आणि दीर्घकाळात, शेअरची किंमत बायबॅक किंमत देखील ओलांडू शकते. अशा स्थितीत काळजीपूर्वक विचार करून किंवा तज्ञांचा सल्ला घेऊन बायबॅकमध्ये भाग घ्यावा.

 

सर्वात मोठी बायबॅक ऑफर
बायबॅक अंतर्गत, TCS गुंतवणूकदारांकडून 4 कोटी इक्विटी शेअर्स खरेदी करेल.
गेल्या 5 वर्षातील कंपनीची ही चौथी आणि सर्वात मोठी बायबॅक ऑफर आहे.
कंपनीची मागील बायबॅक ऑफर 16000 कोटी रुपयांची होती,
जी 18 डिसेंबर 2020 रोजी खुली झाली आणि 1 जानेवारी 2021 रोजी बंद झाली होती.

 

सामान्यपणे, जर कंपनीच्या बॅलन्सशीटमध्ये जास्त कॅश असेल तर कंपनी शेअर बायबॅक करते.
कंपनी आपली अतिरिक्त रक्कम शेअर बायबॅकद्वारे वापरते.

 

शेअर बायबॅकचा गुंतवणूकदारांना कसा फायदा?
जेव्हा कंपनी गुंतवणूकदारांकडून स्वतःचे शेअर्स खरेदी करते तेव्हा त्याला बायबॅक म्हणतात.
कंपनी ही ऑफर शेअरच्या सध्याच्या किमतीवरून प्रीमियमवर ही ऑफर आणते,
म्हणजेच शेअरधारकांनी त्यात भाग घेतल्यास शेअर्सची विक्री करून त्यांना बाजारभावापेक्षा जास्त किंमत मिळते.

 

उदाहरणार्थ, 12 जानेवारी रोजी टीसीएसच्या शेअर बायबॅकची घोषणा झाली तेव्हा शेअरची किंमत रु. 3857 वर बंद झाली.
त्याच वेळी, बायबॅकची किंमत 4500 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.
म्हणजेच, हा बायबॅक सुमारे 17 टक्के प्रीमियमवर पूर्ण करावा लागेल.

Web Title :- TCS Share Buyback | tcs share rs 18000 crore buyback offer open today on 9 march 2022 you should know all key things before particiapte if shareholder

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Assembly Election results 2022 | काँग्रेसच्या पराभवानंतर शरद पवारांनी नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण, दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले …

 

Goa Assembly Result | गोव्यात भाजपचा विजय ! फडणवीसांनी विजयाचे श्रेय दिले ‘या’ दोन व्यक्तींना, स्वत:चं नाव नाही घेतलं

 

UP Election Result 2022 | उत्तर प्रदेशात भाजपची पुन्हा सत्ता, पण ओवैसींच्या AIMIM चं काय झालं? जाणून घ्या