गोव्याचे पोलीस महासंचालक प्रणव नंदा यांचे निधन

नवी दिल्ली : वृत्त संस्था –  गोव्याचे पोलीस महासंचालक प्रणव नंदा यांचे येथे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शासकीर दौऱ्यानिमित्त ते नवी दिल्लीत आले असताना शनिवारी सकाळी त्यांना ह्दयविकाराचा झटका आला व त्यातच त्याचे निधन झाले.

प्रणव नंदा हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. गेल्या फेब्रुवारी महिन्यात त्यांची गोव्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी यापूर्वी अरुणाचल प्रदेश, मेझोराम आणि इतर केंद्र शासित प्रदेशात काम केले आहे.

शुक्रवारी दिवसभर नंदा यांनी गोव्यात काही कार्यक्रमात भाग घेतला. त्यानंतर ते रात्री दिल्लीला पोहचले होते. प्रणव नंदा यांची पत्नी सुंदरी याही भारतीय पोलीस सेवेत असून त्या पाँडेचरी येथे पोलीस महासंचालक म्हणून काम पहात आहेत.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like