पुण्यातील ‘ती’ ८ गोदामे जळून खाक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – चिखली येथे भंगारच्या गोदामाला आग लागल्याने भंगारची आठ गोदामे जळून खाक झाली आहेत. ही घटना काल (गुरुवारी) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चिखली-आळंदी रस्त्यावर भारत स्क्रॅप सेंटर नावाचे भंगारचे गोदाम आहे. या गोदामाला गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशमन विभागाला याबाबत माहिती मिळताच मुख्य अग्निशमन विभागाचे दोन आणि चिखली, तळवडे, प्राधिकरण अग्निशमन विभागाचे प्रत्येकी एक तसेच टाटा मोटर्सचा एक असे एकूण सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. या सहा बंबाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. दरम्यान आग वाढल्याने त्यात आजूबाजूची आणखी सात भंगारची गोदामे जळून खाक झाली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. सुदैवाने घटनेत जीवित हानी झाली नाही. आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तपास पोलीस करत आहेत.

ह्याहि बातम्या वाचा –

कोर्टात न्यायाधीशांना शिव्या देणारा उद्योजक गजाआड

‘पूल दुर्घटनेला पादचारीच जबाबदार’ : भाजप महिला नेता बरळली

Loksabha 2019 : शिवसेनेच्या ‘त्या’ जागेसाठी भाजपची ‘फिल्डींग’ कोणत्या जागेसाठी हे वाचा सविस्तर

राष्ट्रवादीची दुसरी यादी लांबण्याची शक्यता

Loading...
You might also like