जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे लग्नसराईवर काही नियम लागू करण्यात आले आहेत. याचा थेट परिणाम सोनं (gold) आणि चांदीच्या खरेदीवरही झाला आहे. लग्नसराईच्या या दिवसांमध्येच लॉकडाऊन लागू आहे. त्यामुळे या समारंभात आर्थिक बचतीलाच सर्वसामान्य प्राधान्य देत आहे. या पार्श्वभूमीवर, सराफा बाजार थंडावल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या सर्व घडामोडी आणि कोरोनामुळं व्यापारावर झालेल्या परिणामांचे थेट पडसाद सोनं gold आणि चांदीच्या दरांवर दिसून येत आहेत. सोन्या चांदीच्या दरात मागील दिवसांपासून फार कमी फरकानं चढ उतार पाहायला मिळत आहे.

हिंदीसह इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा होईल इंजिनियरिंगचे शिक्षण, एआयसीटीईने (AICTE) दिली परवानगी

देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये २२ कॅरेट सोन्याचे दर किती?
दिल्ली – ४६६९०
बंगळुरू – ४५६९०
चंदीगढ- ४६६९०
कोलकाता – ४८१६०
नाशिक- ४६,४८०

WhatsApp वर तीन रेड टिकचा काय आहे अर्थ? सरकार तुमच्यावर ठेवणार का लक्ष?, जाणून घ्या

शनिवारी देशात चांदीचे दर ४० रुपयांनी कमी झाले असून, आता एक किलो चांदीसाठी ७१६०० रुपये मोजावे लागणार आहेत. सोन्या gold चांदीच्या दरांमध्ये फारशी घट झालेली नसली तरीही हा आकडा काही प्रमाणात उतरला आहे. ‘गुड रिटर्न्स’च्या वेबसाईनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मुंबईत आजच्या दिवशी, प्रती तोळ्यासाठी सोन्याच्या दरात काही रुपयांची घट झाली आहे. शनिवारी देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये सोन्याचे दर प्रती तोळा ४६४८० रुपये इतके आहेत. २२ कॅरेट सोन्यासाठीचे हे दर असून, २४ कॅरेटचे दर ४७४९० रुपये इतके आहेत.

READ ALSO THIS

सर्चचा sex education कार्यक्रम आता YouTube वर देखील उपलब्ध, संचालिका डॉ. राणी बंग करणार मार्गदर्शन

Immunity Booster Kadha : संसर्गापासून मुक्त होण्यास ‘या’ औषधी वनस्पतींचा काढा मोठी मदत करेल; इतर देखील अनेक फायदे, जाणून घ्या