home page top 1

सोनं-चांदी झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दिल्ली सराफ बाजारात सोन्याच्या दरात घट पाहायला मिळाली. दिल्ली सराफ बाजारात सोने 196 रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीच्या किंमतीत देखील घसरण पाहायला मिळाली. आज चांदी थोडी थोडकी नाही तर जवळपास 956 रुपयांनी स्वस्त झाली. दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे दर 38 हजार 706 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर चांदी देखील 45 हजार 498 रुपये प्रति किलोग्रॅम झाले. परंतू येत्या एक दोन दिवसात सोन्याच्या किंमती वाढू शकतात अशी शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे भाव 1,471 डॉलर प्रति औंस झाले तर चांदी 17.06 डॉलर प्रति औंस झाली. तज्ज्ञांनी जगभरातील अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचे चिन्ह असल्याचे सांगितले आहे. याचमुळे सोन्याच्या किंमतीत जास्त वाढ अपेक्षित नाही.

सोनं खरेदी करताना ही घ्यावी काळजी
केडिया कमाॅडिटीचे अजय केडिया यांनी सांगितले की सोन्याची खरेदी करताना हॉलमार्क असलेलेच दागिने खरेदी केले पाहिजे. हे हॉलमार्किंग ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डकडून करण्यात येते. सोन्याची गुणवता या चाचणीतून होते. ज्या दागिन्यांवर हॉलमार्क असते त्यातील सोने शुद्ध असते. सोन्याचे दागिने खरेदी करताना त्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र देखील घेणे आवश्यक आहे.

Visit : Policenama.com 

 

Loading...
You might also like