पुणे : विश्रांतवाडी परिसरात साखळीचोरांचा ‘उच्छाद’, 10 मिनीटांमध्ये 2 महिलांचे मंगळसूत्र हिसकावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात घरफोड्यांसोबतच अधून-मधून सोन साखळी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, विश्रांतवाडीत केवळ दहा मिनिटांत दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावल्याच्या घटना घडल्या आहेत. सुभाषनगर आणि टिंगरेनगरमध्ये या घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार बुधवारी सकाळी सहा वाजून 40 मिनिटे आणि दुसरा प्रकार 6 वाजून 50 मिनिटांनी घडला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील 31 वर्षीय फिर्यादी या त्यांच्या मुलाला सोडून घरी परत पायी येत होत्या. त्यावेळी त्या सुभाषनगर येथून हनुमान मंदिराच्या पाठिमागे आल्या असता पाठिमागून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 37 हजार रुपयांचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकामारून चोरून नेले. तर, दुसर्‍या घटनेत 58 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 52 हजार रुपयांचे मंगळसुत्र चोरून नेले आहे. फिर्यादी या सकाळी पतीसोबत मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. ते दोघेही घरी जात असताना टिंगरेनगर येथील एचडीएफसी एटीएम केंद्राजवळ दुचाकीस्वार सोन साखळी चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून पोबारा केला. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/