खुशखबर ! सोन्या-चांदीच्या दरात मोठी ‘घट’, जाणून घ्या दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या भावात 700 रुपयांनी तर चांदीच्या भावात 2,450 घसरण झाली आहे. परदेशात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण झाल्याने दिल्ली सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर कोसळले आहेत. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर दहा ग्रॅम 700 रुपयांनी घसरून 39,270 रुपये झाला. शनिवार व रविवारच्या शेवटी चांदी 2,450 रुपयांनी घसरून 45,450 रुपयांवर आली.

भारतीय बाजारपेठेतील वैवाहिक कारणासाठी सोन्याची मागणी कायम आहे, त्यामुळे परदेशाच्या तुलनेत सोन्याच्या भावात कमी घसरण झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव असल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.

लंडन आणि न्यूयॉर्ककडून मिळालेल्या सोन्याच्या दराच्या माहितीनुसार, सोन्याचा भाव गेल्या आठवड्यात 54.85 म्हणजेच 3.62 टक्क्यांनी घसरून 1,459.05 डॉलर प्रति औंस झाला. डिसेंबरमधील सोन्याचे वायदेही 51.60 डॉलर किंवा 3.41 टक्क्यांनी घसरून 1,459.80 डॉलर प्रति औंस झाला. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार युद्धामध्ये सामंजस्याच्या अपेक्षेने पिवळ्या धातूवर दबाव असल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किमतीही 1.30 डॉलर किंवा 7.20 टक्क्यांनी घसरून 16.76 डॉलर प्रति औंस झाले.

Visit : Policenama.com