चांदी ‘गडगडली’ पण सोन्यात ‘तेजी’ कायम !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुन्हा एकदा भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमती वधारल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात २०० रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत सोन्याचे भाव २०० रुपयांनी वाढून ३८,७७० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहेत. आज देशात सर्वात महागडे सोने विकले जात आहे. परंतू चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत.

सोन्या चांदीची भाव –
आज सराफ बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोने
२०० रुपयांनी वाढून ३८,७७० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे. तर ९९.५ टक्के शुद्ध सोने २०० रुपयांनी वाढून ३८,६०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे.

चांदी झाली स्वस्त –
चांदीचे भाव ११०० रुपयांनी कमी होऊन ४३,९०० रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत. याशिवाय भाव वधारलेल्या चांदीने देखील काल दिलासा मिळाला आणि ५० रुपयांने चांदी स्वस्त झाली होती.

दिल्ली सराफ बाजारात काल सोने १०० रुपयांनी स्वस्त झाले होते. यामुळे सोन्याचे भाव १० ग्रॅम मागे ३८,५७० रुपये झाले होते. भारतीय सराफ बाजारात शनिवारी सोन्याचे दर ३८,६७० रुपये प्रति १० ग्रॅम होते.

आरोग्यविषयक वृत्त